JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / चालू कीर्तनात दारुड्या पतीचा तमाशा; पत्नीला शिवीगाळ करत बेदम मारहाण, परळीतील घटना

चालू कीर्तनात दारुड्या पतीचा तमाशा; पत्नीला शिवीगाळ करत बेदम मारहाण, परळीतील घटना

Crime in Beed: महाराजांच्या कीर्तनाला जाताना पत्नी विचारून गेली नाही, म्हणून एका दारुड्या पतीने (drunken husband) आपल्या पत्नीला चालू कीर्तनात मारहाण (Beat wife in live program) केली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

परळी, 09 जुलै: महाराजांच्या कीर्तनाला जाताना पत्नी विचारून गेली नाही, म्हणून एका दारुड्या पतीने (drunken husband) आपल्या पत्नीला चालू कीर्तनात मारहाण (Beat wife in live program) केली आहे. आरोपीनं हातात शस्त्र घेऊन पत्नीला मारहाण केली आहे. त्यामुळे कीर्तनातील अन्य लोकंही घाबरून मदतीला येऊ शकले नाही. आरोपी दारुड्या पतीनं चालू कीर्तनात बराच वेळा राडा घातल्यानंतर, महाराजानं स्वतः हे प्रकरण शांत केलं आहे. विशेष म्हणजे संबंधित कीर्तन व्यसनमुक्ती प्रबोधनासंदर्भात होतं. त्यामुळे महाराजांसमोरच हा सर्व प्रकार घडल्यानं महाराज देखील हैराण झाले होते. संबंधित संतापजनक घटना बीड जिल्ह्यातील मालेवाडी याठिकाणी घडली आहे. आरोपी दारुड्या व्यक्तीनं आपल्या बायकोसोबत भांडण सोडवायला येणाऱ्या अन्य तरुणांदेखील मारहाण केली आहे. माणिक कुंडलिक बदने असं मारहाण करणाऱ्या दारुड्या पतीचं नाव असून परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा तपास परळी पोलीस करत आहेत. हेही वाचा- VIDEO: वाहतूक पोलिसाशी भररस्त्यात वाद:धमकावणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ढसाढसा रडवलं नेमकं काय घडलं? परळीपासून सात किलोमीटर अंतरावर असणाऱ्या मालेवाडी गावात दुपारी तीनच्या सुमारास कीर्तनाचा कार्यक्रम सुरू होता. गावातील बरेच लोकं या कीर्तनाला आली होती. पीडित महिला देखील या कार्यक्रमाला आली होती. दरम्यान पीडित महिलेचा पती माणिक बदने याठिकाणी आला. त्यानं ‘तू कोणाला विचारून कीर्तनास आलीस’, असं विचारत पत्नीला शिवीगाळ करायला सुरुवात केली. यानंतर त्यानं दगडानं आणि लाथाबुक्क्यांनी बायकोला मारहाण करायला सुरुवात केली. हेही वाचा- अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं; 15 दिवस भाड्याच्या खोलीत ठेवलं अन्… दरम्यान, कीर्तनाच्या ठिकाणी शिवीगाळ नका करू असं समजावून सांगणाऱ्या सुदाम आंधळे आणि मालेवाडीच्या सरपंचाचे पती भुराज बदने यांना आरोपीनं धारदार शस्त्राने वार करत जखमी केलं. त्याचबरोबर गावातील अन्य व्यक्तींना देखील आरोपीनं दगडानं मारहाण करायला सुरुवात केली. त्यामुळे भांडण सोडवायला देखील कोणी पुढं जात नव्हते. शेवटी कीर्तनकार महाराजांनी मध्यस्थी करत हे प्रकरण शांत केलं. महिलेच्या तक्रारीनंतर परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या