JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Dasara Melava : 'आम्ही कायदा पाळायचा, अन् तुम्ही डुकरं पाळायची', ठाकरेंचा फडणवीसांवर पलटवार

Dasara Melava : 'आम्ही कायदा पाळायचा, अन् तुम्ही डुकरं पाळायची', ठाकरेंचा फडणवीसांवर पलटवार

दसरा मेळाव्यातल्या सभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपवरही निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या कायदा सुव्यवस्थेच्या वक्तव्याचाही समाचार घेतला.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 5 ऑक्टोबर : दसरा मेळाव्यातल्या सभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपवरही निशाणा साधला आहे. दसरा मेळाव्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, अशी वक्तव्य करू नका असं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्याचा उद्धव ठाकरे यांनी समाचार घेतला. ‘बोलण्याची पंचाईत होते, कारण उपमुख्यमंत्र्यांना कायदा खूप कळतो. मुख्यमंत्री असताना ते मी पुन्हा येईन म्हणाले, पुन्हा येऊन दीड दिवसांमध्ये विसर्जन झालं. आता मन मारून उपमुख्यमंत्री झाले आहेत. आम्ही कायदा पाळायचा आणि तुम्ही डुकरं पाळायची. हाच जर तुमचा कायदा असेल तर जाळून टाकू,’ अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

‘नगरसेवकांना धमकावतात, सलून काढलं आहे केसेस काढायचं. मी सांगतो शांत राहा म्हणून हे शांत आहेत, त्यांना पिसाळायला लावू नका. माझ्या शिवसैनिकांना त्रास दिला तर तुमचा कायदा मांडीवर घेऊन कुरवाळत बसा,’ असा निशाणा उद्धव ठाकरे यांनी साधला.

अमित शाहंवरही टीका अमित शहा हे देशाचे गृह मंत्री आहेत की भाजपचे घरगुती मंत्री आहेत? इकडे जातात तिकडे जातात आणि सरकार पाडतात. आम्हाला जमीन दाखवाल, पण पाकव्याप्त काश्मीरची एक फुट जमीन आणून दाखवा. आम्ही तुम्हाला खांद्यावर घेवून नाचू, पण तिकडे शेपट्या घालतात आणि इकडे नखं दाखवतात, असं आव्हान उद्धव ठाकरेंनी अमित शाह यांना दिलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या