एक-दोन नव्हे आता तिसरे ठाकरे शिंदेंच्या गोटात
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आता कुटुंबातून मोठा धक्का बसलाय.
दसरा मेळाव्यानिमित्त शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन मेळावे होत आहेत.
यामध्ये शिंदे गटाच्या मेळाव्याला स्मिता ठाकरे यांनी हजेरी लावली आहे.
यावेळी उद्धव ठाकरे यांचे पुतणे निहार ठाकरे हे देखील उपस्थित होते.
दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि मीनाताई ठाकरे यांना तीन मुलं होती.
बिंदूमाधव हे थोरले, जयदेव मधले आणि उद्धव ठाकरे हे सर्वात लहान आहेत.
शिंदे गटाच्या कार्यक्रमात जयदेव ठाकरे यांना पानाचं पान देण्यात आलंय.
स्मिता आणि निहार ठाकरेंनंतर आता जयदेव यांनीही शिंदे यांनी पाठींबा दिला.
पूर्वी स्मिता ठाकरे देखील राजकारणात सक्रीय होत्या. मात्र, उद्धव ठाकरे राजकारणात सक्रीय झाल्यानंतर त्या दूर गेल्या.
पण, आता पुन्हा त्या राजकारणात सक्रीय होण्याची शक्यता आहे.
उद्धव यांना दोन मुलं असली तरी सध्या फक्त आदित्य ठाकरे राजकारणात सक्रीय आहे.
ठाकरेंचा शिवाजी पार्क तर शिंदेंचा बीकेसीवर मैदानावर दसरा मेळावा झाला.