संगमनेर, 01 एप्रिल : जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसने महाराष्ट्रामध्ये हैदोस घातला आहे. दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोनाविरोधात लढ्यासाठी राज्य सरकारने सढळ हाताने मदत करावं असं आवाहन केलं आहे. प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराज यांनीही कोरोनाविरोधात लढ्यात खारीचा वाटा उचलला आहे. प्रबोधनकार इंदोरीकर महाराज देखील कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे आले आहे. इंदुरीकर महाराजांनी आज एक लाख रूपयांचा धनादेश संगमनेर तालुक्याचे तहसीलदारांकडे सुपूर्द केला आहे. कोरोना सहायता निधीत त्यांनी आपल्याकडील 1 लाख रूपये देणगी दिली आहेत. हेही वाचा -
सेवानिवृत्तीच्या शेवटपर्यंत बजावलं कर्तव्य, महाराष्ट्र पोलिसांतील जवानाला सलाम
आज दुपारी संगमनेरचे तहसीलदार अमोल निकम आणि गटविकास अधिकारी सुरेश शिंदे यांच्याकडे हा धनादेश सुपूर्द करण्यात आला आहे. अनेकदा इंदुरीकर महाराजांनी आपत्तीच्या वेळी आपला हातभार लावत असतात.
कोल्हापूर, सांगलीतल्या महापुराच्या वेळीही इंदुरीकर महाराजांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे संगमनेर येथील सभेत मदतीचा चेक सुपूर्द केला होता. मात्र, त्यावेळी इंदुरीकर महाराज निवडणूक लढवणार अशाच चर्चा जास्त झडल्या होत्या. **हेही वाचा -**
जगाला कोरोनाच्या धोक्याबाबत अलर्ट करणारी महिला डॉक्टर बेपत्ता
इंदुरीकर महाराज राज्यभर किर्तनाचे कार्यक्रम करून समाज प्रबोधनाचे काम करत असतात. आपल्या वेगळ्या शैलीमुळे इंदुरीकर घराघरात पोहचले आहेत. मात्र, अनेकदा त्यांना टीकेचं धनीही व्हावं लागलंय. असं जरी असलं तरी इंदुरीकर महाराजांनी आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे. मिळणाऱ्या पैशातून त्यांनी शाळा बांधली आहे तसंच अनेक निराधार मुलांच्या राहण्याची आणि शिक्षणाची जबाबदारी देखील इंदुरीकर महाराजांनी घेतली आहे. आज कोरोनाचा सामना करण्यासाठी राज्य सरकारला त्यांनी एक लाखाची मदत करून आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे.