मुंबई, 28 मे : Coronavirusचा प्रादुर्भाव राज्यात विशेषतः मुंबईत कमी होण्याचं नाव घेत नाही आणि त्यात सर्वाधिक धोका मुंबई पोलिसांना आहे. संपूर्ण राज्यात आतापर्यंत 2095 पोलिस कोरोनाबाधित आहेत. यात 236 पोलिस अधिकारी आणि 1859 पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आतापर्यंत एकूण 22 पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 897 पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे. आता दोन IPS अधिकारी आणि एक वरिष्ठ IPS अधिकारी यांना विषाणूची लक्षणं आढळली आहेत. राज्यात दोन कॅबिनेट मंत्री कोरोनाग्रस्त आढळल्यानंतर मंत्रालयातील सचिव दर्जाचे अधिकारीही पॉझिटिव्ह सापडले आहेत. ते कॅबिनेट मिटिंगला उपस्थित होते का याचीच तपासणी केली जात आहे. वरिष्ठ आयपीएस अधिकारी देखील मुंबईत महत्त्वाच्या पोस्टवर जबाबदारीवर होते. फिल्डवर काम करत असताना पॉझिटिव्ह आढळल्याची माहिती मिळत आहे. संबंधित सर्व आयपीएस आणि आयएएस अधिकाऱ्यांना पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती देखील समजते. याआधीच एका आयएएस आणि आयपीएस पती-पत्नींना लक्षण आढळली असून त्यांच्यावर देखील उपचार सुरू आहेत. या विषाणूंचा प्रादुर्भाव मुंबई प्रचंड वाढत असल्याने जे अधिकारी काम करत आहेत त्यांना या विषाणूची लागण होत असल्याचे आढळन येत आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांना या विषाणूची लागण झाल्याने अनेकांच्या मनात भीती वाढत आहे. राज्यात सतत वाढणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येत भर पडत आहे. यात कायदा व सुव्यवस्थेचे काम करणाऱ्या पोलिसांनाही मोठ्या प्रमाणात संसर्ग होऊ लागला आहे. कोरोनाविरुद्ध युद्ध लढणाऱ्या कोरोना वीरांना या धोकादायक विषाणूंची लागण होत असल्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या (BMC) 1529 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. आतापर्यत कोरोनामुळे 25 कर्मचाऱ्यांनी प्राण गमावला आहे. कोविड-19 च्या प्रादुर्भावानंतर पहिल्यांदा बीएमसीने ही आकडेवारी जाहीर केली आहे. अन्य बातम्या कोरोना विरोधात या 9 औषधांची भारतात केली जातेय चाचणी, काय आहेत त्यांची नावं? धारावीत कोरोनाचं थैमान, रूग्णांच्या संख्येनं ओलांडला धक्कादायक टप्पा लस तयार करण्यासाठी 10 वर्षे लागतात, सरकारकडून एका वर्षांत तयार करण्याचा प्रयत्न