मुंबई 7 जुलै: राज्यात गेले काही दिवस 6000 वर कोरोना रुग्णांची दररोज भर पडत होती. त्यामध्ये आज किंचित घट झाली. गेल्या 24 तासांमध्ये राज्यात 5134 रुग्ण आढळून आलेत. तर 224 जणांचा मृत्यू झाला. पण दिवसभरात डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्याही मोठी आहे. 3296 रुग्णांना बरं होऊन घरी सोडण्यात आलं. राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या 2,17,121 एवढी झाली आहे. तर मृत्यूचा आकडा 9250 वर गेला आहे. Unlock नंतर Corona रुग्णांच्या संख्येत तिपटीने वाढ झाली आहे. पण मृत्यूदर फारसा वाढलेला नाही. महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट - 54.6% कोविड मृत्यूदर - 4.26% अॅक्टिव्ह रुग्ण - 89,294 एकूण मृत्यू - 9250 एकूण रुग्णसंख्या - 2,17,121 देशाच्या मानाने महाराष्ट्राचा मृत्यूदर अजूनही चढा आहे. देशाचा विचार केला तर सरासरी कोविड मृत्यूदर 2.98 वर आला आहे. देशात गेल्या काही दिवसांपासून नवीन रुग्ण हे 20 हजारांच्या वर आहे. गेल्या 24 तासांतही 24 हजार 248 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 425 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यासह भारतातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा हा 7 लाखांच्या घरात गेला आहे. सध्या देशात 6 लाख 97 हजार 413 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. यातील 2 लाख 53 हजार 287 सक्रीय रुग्ण आहेत. तर 4 लाख 24 हजार 433 रुग्म निरोगी झाले आहेत. तर, एकूण मृतांची संख्या 19 हजार 693 झाली आहे. जगभरातील इतर देशांच्या तुलनेत कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत भारत आता तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. भारतानं रशियाला मागे टाकले आहे. याचबरोबर भारताचा पॉझिटिव्ह रुग्णांची आकडेवारी ही गेल्या काही दिवसांत सर्वात जास्त आहे. देशाचा पॉझिटिव्ह रेट हा 13.42 % आहे. तर मृत्यूदरही वाढत आहे. Corona चाचणीचा नियम बदलला; आता मुंबईत नाही लागणार डॉक्टरांची शिफारस राज्यात मुंबईत कोरोनारुग्ण अधिक पण साथ नियंत्रणात येत असल्याचं चित्र आहे. सर्वाधिक प्रादुर्भावाची भीती असणाऱ्या धारावीमध्ये आज दिवसभरता फक्त एक रुग्ण सापडला. मुंबईत दिवसभरात सर्वात कमी रुग्ण सापडले आहेत. पुण्यात मात्र Coronavirus ची लागण वाढत आहे. हवेतून पसरणारा Coronavirus किती धोकादायक? पुण्यात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. (Pune Covid-19 patient ) दररोज कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर माजी महापौर आणि आमदार मुक्ता टिळक यांना लागण झाल्याचं वृत्त आहे. इतरही काही पदाधिकारी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना संसर्ग झाल्याने आता राजकीय वर्तुळात कोरोनाची धास्ती निर्माण झाली आहे.