मुंबई, 20 एप्रिल : कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी 3 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला असला तरीही प्रत्येक राज्य आणि जिल्ह्यातील कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेऊन तिथले काही नियम शिथील करण्यात येतील असं पंतप्रधान मोदींनी 14 एप्रिलला आदेश दिले होते. त्यानुसार आजपासून कोरोनामुक्त झालेली राज्य आणि कोरोनाचा धोका कमी असणाऱ्या राज्यांमध्ये अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त काही सेवा सुरू करण्यात येणार आहेत. लॉकडाऊनच्या या फेज -2 साठी केंद्र सरकारने यापूर्वी सविस्तर गाइडलाईन जारी केली आहे. लॉकडाऊनची ही दुसरी फेज 3 मे रोजी संपणार आहे, परंतु यावेळी काही नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत, तर काही राज्यांनी स्वत: च्या मार्गाने हे निर्बंध हटविण्याचा निर्णय घेतला आहे. गृहमंत्रालयाने जाहीर केलेल्या नियमावलीमध्ये शेती आणि ग्रामीण भागांतील विशिष्ट उद्योगांना विशेष सवलती देण्यात आल्या आहेत. तर, हवाई सेवा, रेल्वे सेवा, टॅक्सी, मेट्रो, शाळा, मॉल्स, जलतरण तलाव, जीम यांसारख्या सर्व सेवा बंद राहणार आहेत. ही नियमावली हॉटस्पॉट किंवा सील झालेल्या भागांमध्ये लागू होणार नाही. हे वाचा- कोरोनाची संशयित पतीला 4 रुग्णालयांनी नाकारलं म्हणून पत्नीनं घरीच केले उपचार महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा आणि इतर महत्त्वाच्या कामांना परवाणगी दिली असली तरी सांस्कृतीक कार्यक्रम आणि रेल्वे व विमान सेवा या 3 मेपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिली आहे. कोरोनामुक्त असलेल्या जिल्ह्यांमध्ये आणि कोरोनाची संख्या कमी असणाऱ्या म्हणजेच ग्रीन आणि ऑरेंज झोनसाठी उद्योगधंद्यांना परवानगी देण्यात आली आहे. जिल्ह्यांतर्गत व्यवहार देवाण-घेवाण आणि प्रवास करता येऊ शकतात. मात्र मात्र जिल्ह्यात ते जिल्ह्या असा प्रवास किंवा कोणतेही व्यवहार सध्या करता येणार नाहीत. रेड झोनम आणि हॉटस्पॉट असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये नियमांच काटेकोरपणे पालन करण्यात येणार आहे. या ठिकाणी कोणतेही नियम शिथील करण्यात आले नाहीत. ऑरेंज झोनमध्ये कोरोनाचा प्रभाव मध्यम असलेल्या जवळपास 18 जिल्ह्यांचा समावेश आहे. यामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, नाशिक, अहमदनगर, जळगाव, उस्मानाबाद, बीड, जालना, हिंगोली, लातूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा, वाशीम, गोंदिया हे जिल्हे आहेत. ग्रीन झोनमध्ये धुळे, नंदूरबार, सोलापुर, परभणी, नांदेड, वर्धा, चंद्रपूर, भंडारा आणि गडचिरोली हे जिल्हे आहेत. शेतीची कामं सुरू राहतील शेतकरी संबंधित सर्व उपक्रम तसेच, शेतकऱ्यांना काम करण्याची परवानगी दिली जाणार आहे. कृषी उपकरणांची दुकाने, त्यांची दुरुस्ती व सुटे भागांची दुकाने खुली राहतील. खते, बियाणे, कीटकनाशके तयार करणे व त्यांचे वितरण करण्याचे काम चालूच राहतील, त्यांची दुकाने खुली असतील. एका राज्यातून दुसर्या राज्यात शेतीसंबंधित साहित्याची देवाणघेवाण केली जाऊ शकते. बँकसेवा सुरू राहणार लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्याप्रमाणे बॅंकसेवा सुरू राहणार आहे. लोकांना पैशांची चणचण जाणवू नये यासाठी ATMही 24 तास सुरू राहतील. बॅंका सुरू असल्या तरी, कामकाजाच्या वेळेत कपात करण्यात आली आहे. हे वाचा- बापरे! फक्त फुफ्फुस नव्हे तर आता हृदयापर्यंत पोहोचला Coronavirus केरळमध्ये नियम शिथील तर पंजाब-दिल्लीत लॉकडाऊनचं कटेकोरपणे पालन दिल्लीत कोरोनाग्रस्तांचा आकडा दोन हजार पार गेल्यानं मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी लॉकडाऊनमध्ये ढील न देण्यावर ठाम आहेत. 3 मेपर्यंत लॉकडाऊनच्या नियमांचं कटेकोरपणे पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर दुसरीकडे पंजाब सरकारनं कर्फ्यूमध्ये सूट न देण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. केरळमध्ये मात्र तीन झोननुसार सूट देण्यात आली आहे. रेड झोन वगळता अनेक नियम शिथील करण्यात आले आहेत. तिथे तर 1 तासासाठी रेस्टॉरंटही सुरू ठेवण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. हे वाचा- ‘उन्हात नष्ट होतो कोरोना’, प्रयोग अंतिम टप्प्यात असल्याचा अमेरिकेचा दावा संपादन- क्रांती कानेटकर