JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / कोरोनाचे रिपोर्ट प्रिंट करताना स्वतःच्या चिमुकल्याचं नाव आलं समोर, बापाचं भावनिक पत्र

कोरोनाचे रिपोर्ट प्रिंट करताना स्वतःच्या चिमुकल्याचं नाव आलं समोर, बापाचं भावनिक पत्र

‘कोरोना योद्ध्याच्या चिमुकल्याचा रिपोर्टही पॉझिटिव्ह यावा आणि तो रिपोर्ट स्वत:ला प्रिंट करायला लागावा.’

जाहिरात

कोरोनावरचं Sputnik V हे औषध सुरक्षित असल्याचा दावा रशिया कायम करत आला आहे.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अकोला, 29 मे : देशभरात कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी आरोग्य सेवा, पोलीस आपला जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावत आहेत. या वॉरियर्सच्या घरापर्यंत आता कोरोना पोहोचला आहे. मन सून्न कऱणारी एक अशीच घटना अकोल्यातही घडली. इतरांचे कोरोनाचे रिपोर्ट काढणाऱ्या कोरोना योद्ध्याच्या चिमुकल्याचा रिपोर्टही पॉझिटिव्ह यावा आणि तो रिपोर्ट स्वत:ला प्रिंट करायला लागावा. या कोरोना योद्धात असलेला वडिलांच्या डोळ्यातील अश्रू मात्र अनावर झाले. स्वत:ला सावरत त्यांनी घरी सांगायचं ठरवलं. या कोरोना योद्धानं याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. इतरांसाठी कोरोना योद्ध आणि चिमुकल्यासाठी वडील म्हणून कर्तव्य बजावताना त्यांनी लिहिलेलं हे पत्र मन सून्न करणारं आहे. वैद्यकीय कर्मचाऱ्यानं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, ‘‘4 दिवसांपूर्वी मुलाला ताप असल्यानं त्याला बालरोगतज्ज्ञांकडे घेऊन गेलो. त्याच्यासोबत त्याचे दोन मित्रही होते. तेथून घराकडे परतताना हॉस्पिटलमध्ये त्याचा स्वॅब देऊन घरी आलो. त्याचा ताप कमी झाला होता. त्यामुळे तो पुन्हा मित्रांसोबत खेळायला लागला. दोन दिवसांनी मी ऑफिसमधील कम्पुटरवर कोरोनाग्रस्तांचे अहवाल तपासत होतो. अचानक त्यामध्ये माझ्या मुलासह त्याच्या दोन मित्रांची नावं दिसली. तिघांचेही रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानं माझ्या पायाखालची जमीन सरकली. स्वत:ला या धक्क्यातून सावरत मी घरी पोहोचलो.’’ हे वाचा- पुणे कोरोनानं हादरलं, कामगाराच्या अचानक मृत्यूनंतर आला धक्कादायक रिपोर्ट ‘‘वाटेत मुलीचा फोन आला बाबा त्याचा रिपोर्ट काय आला ? फोनवर तिला सांगता येत नव्हतं. घरी आल्या आल्या दोन्ही लहान मुलं विचारत होती रिपोर्ट काय आहे ? मी सरळ सांगून टाकलं, की तो पॉझिटिव्ह आला आहे. आपला रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचं ऐकून जोरजोरात दोघांची रडारड सुरू झाली. दोघांनाही समजून सांगताना जीव मेटाकुटीला आला होता. आपले अश्रू लपवताना त्यांचे अश्रू थांबवणे कठीण जात होतं. बाबा आता काय होणार? असा प्रश्न दोघंही वारंवार विचारत होते. त्याच्या बहिणीला समजून सांगताना जड जात होतं की बेटा तो आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात राहणार. मग तिने प्रश्न केला बाबा मीही त्याच्यासोबत राहते चालेल का? तो एवढा लहान आहे एकटा कसा राहील ? मी मात्र निरुत्तर आणि स्तब्ध होतो. एकाला वाचवायला दुसऱ्याला अर्पण करायला निघालो होतो. परिस्थितीच तशी भीषण होती.’’ हे वाचा- कोरोनामुळे मृत्यू रात्रभर कुटुंबीयांनी व्यक्त केला शोक आणि अचानक… ‘‘त्याच्या बहिणीने मोठ्या मनाने त्याची आणि तिची बॅग भरली. टूथ ब्रश, साबण जेवणाचं ताट, कपडे बॅगेत भरत होती. माझं मन आणि शरीर गळून गेलं होतं. पण ती स्थिर झाली नि तिने मला व त्याला समजावलं. पाहता-पाहता सायंकाळचे सहा वाजले. संपूर्ण परिसराला समजले होते की, आम्ही पॉझिटिव्ह आलो आहे. काही वेळाने 108 रुग्णवाहिका घराजवळ आली. त्यात तो आणि त्याचे दोन मित्र त्यांचे आई-वडील बसले होते. जन्मापासून आतापर्यंत ज्या आई-वडिलांचं बोट कधीच सोडलं नाही आज त्यांच्यापासून लांब राहण्याची वेळ आली होती. ही खूप मोठी परीक्षा होती. या भीषण परिस्थितीतून बाहेर येण्याची शक्ती ईश्वर त्यांना देवो हीच प्रार्थना. माझ्या संपूर्ण जन्माचं पुण्य तूला लागो. तू आणि तो सुखरूप घरी परत येवो. हीच प्रार्थना. तुझ्या सारखीच मुलगी सर्वांना देवो हे मागतो…’’ हे वाचा- 31 मेनंतर लॉकडाऊन वाढणार की नाही? अमित शाह यांनी मुख्यमंत्र्यांशी केली चर्चा संपादन- क्रांती कानेटकर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या