JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / मालेगावात कोरोनाचं थैमान सुरूच, पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या पोहोचली 110 वर

मालेगावात कोरोनाचं थैमान सुरूच, पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या पोहोचली 110 वर

मालेगावात कोरोना विषाणूचं थैमान सुरूच आहे. गुरुवारी दुपारपर्यत 14 रुग्णांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यात 6 पुरुष तर 3 महिलांचा सामावेश आहे.

जाहिरात

भारत बायोटेक (Bharat Biotech) ची Covaxin आणि झाइडस कॅडिलाची ZyCoVD च्या दोन कंपन्या आणि सिरमचं काम प्रगती पथावर आहेत.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मालेगाव, 23 एप्रिल: मालेगावात कोरोना विषाणूचं थैमान सुरूच आहे. गुरुवारी दुपारपर्यत 14 रुग्णांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यात 6 पुरुष तर 3 महिलांचा सामावेश आहे. सकाळी 5 आणि दुपारी 9 असे एका दिवसात कोरोनाचे 14 रुग्ण कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे मालेगावात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 110 वर पोहोचली आहे.  एकट्या मालेगावात कोरोनाने 9 जणांचा बळी घेतला आहे, अशी माहिती सामान्य रुग्णलायतील सहाय्यक वैद्यकीय अधिकारी योगेश पाटील यांनी दिली आहे. हेही वाचा.. वाधवान बंधूंसह 21 जणांना पोलिस बंदोबस्तात पाचगणीहून महाबळेश्वरला हलवलं मालेगाव बनला कोरोनाचा ‘हॉटस्पॉट’ नाशिक जिल्ह्यातील मालेगावात आतापर्यंत कोरोनाचे 110 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. नाशकात 10 पॉझिटिव्ह तर ग्रामीण भागात 4 पॉझिटिव्ह आहेत. मालेगाव कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. नागरिकांमध्ये भीती आहे. मात्र, कोणीही गांभीर्याने घेण्यात तयार नाही. दररोज मोठ्या संख्येने नागरिक घराबाहेर पडत आहेत. आता तर प्रशासनही हतबल झाले आहे. वेळीच कठोर पावलं उचलली नाहीत तर परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. मालेगावात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत सातत्यानं वाढ होत आहे. आतापर्यंत मालेगाव शहरात कोरोनाबाधित रुग्णांनी शंभरी गाठली आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात मालेगाव शहर कोरोनाचा हॉटस्पॉट बनले आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल आहे. तरी देखील कोरोना या प्राणघातक रोगाला कोणीही गांभीर्याने घेण्यास तयार नाही. दररोज मोठ्या संख्येने नागरिक घराबाहेर पडून बाजारात गर्दी करत आहेत. गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासन कमी पडत आहे. तर दुसरीकडे ज्यांच्यावर नागरिकांमध्ये कोरोना हा किती घातक आहे, याची जाणीव करून देण्याची जबाबदारी आहे. असे आजीमाजी लोकप्रतिनिधीनी जनतेला वाऱ्यावर सोडत किरकोळ कारणावरून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात गुंतले आहेत. त्यामुळे आता जर सर्वांनी मिळून कठोर पाऊल उचललं नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाण्यास वेळ लागणार नाही. हेही वाचा.. कल्याण-डोंबिवलीमध्ये चिंता वाढली, 48 जणांना कोरोना विषाणूची बाधा लॉकडाऊनचं उल्लंघन… मालेगाव शहरात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होणास स्थानिक नागरिक कारणीभूत ठरत आहेत. शहरात लॉकडाऊनचं मोठ्या प्रमाणात उल्लंघन होत आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाची धावपळ होत असून एकूण 400 जणांची पथके तैनात करण्यात आली आहेत. संपादन- संदीप पारोळेकर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या