JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / #Lockdown: युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मुलाने घरीच केली वडील आमदारांची कटिंग

#Lockdown: युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मुलाने घरीच केली वडील आमदारांची कटिंग

राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन आहे. यामुळे आता नवं संकट आलं आहे. ते म्हणजे हेअर कटिंगचं.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 9 एप्रिल: राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन आहे. यामुळे आता नवं संकट आलं आहे. ते म्हणजे हेअर कटिंगचं. सर्वत्र हेअर सलून बंद असल्याने केस कसे कापायचे हा प्रश्नच निर्माण झाला आहे. मात्र, यावर एका काँग्रेस नेत्यानं जुगाड शोधून काढला आहे. ‘मी स्वत:च माझ्या पप्पांचे केस कापले’, असं सांगत महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी लॉकडाऊनच्या काळातील आपला आगळावेगळा अनुभव शेअर केला आहे. लॉकडाऊनच्या काळात सत्यजित तांबे यांनी विधान परिषदेचे आमदार असलेले त्यांचे वडील सुधीर तांबे यांची घरीच कटिंग केली. हेही वाचा.. अडवलंच का? असा जाब विचारत तरुणांकडून पोलिसांना बेदम मारहाण: VIDEO ‘लहानपणापासून आमचा नेहमीचा हेअर ड्रेसर द्वारका पवार याचे काम पाहून मला कायम वाटायचं की केस कापणं म्हणजे सोपंच काम…नेहमी केस कापणाऱ्याला सूचना… असे काप… तसे काप! आज पप्पांचे केस कापतांना एका गोष्टीची जाणीव झाली…जगात कुठलेच काम सोपे नाही… आणि कामापेक्षा मोठा कोणता धर्म नाही. माझ्यासोबत मदतीला मुलगी अहिल्या होतीच’, असे युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी सांगितले. हेही वाचा.. अजित पवार यांच्या सुचनेनंतर बारामतीत घेतला मोठा निर्णय, मध्यरात्रीनंतर.. दरम्यान, राज्यात सध्या लॉकडाऊनमुळे सर्वत्र हेअर सलून बंद आहेत. सद्यस्थिती लक्षात घेता लॉकडाऊन आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तर नागरिकांची समस्या आणखी वाढणार आहे. अशा परिस्थितीत कटिंग करायची कशी? तर मग काय शेवटी सत्यजित तांबे यांनी केलेला घरगुती उपाय सगळ्यांना करावा लागणार आहे. संपादन- संदीप पारोळेकर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या