JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Corona Alert! नागपूरमध्ये चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर

Corona Alert! नागपूरमध्ये चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर

कोरोनाची लस आल्यावर आता या विषाणूचा प्रभाव ओसरत असल्याचं चित्र निर्माण झालं होतं. मात्र राज्यातल्या काही शहरांमध्ये आता विषाणू नव्यानं डोकं वर काढतो आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नागपूर, 11 फेब्रुवारी : कोरोनाची लस (corona vaccine) भारतात उपलब्ध झाली आहे. सोबतच लसीकरणही (vaccination) सुरू झाले आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये (citizens) एकप्रकारची बेफिकिरी निर्माण झाल्याचं पाहायला दिसतं आहे. पण राज्यातल्या काही शहरांना मात्र नव्याने इशारा देणारी आकडेवारी समोर आली आहे. नागपूरमध्ये Covid-19 ची नव्यानं लाट (new wave) आल्याचं चित्र निर्माण झालं आहे. नागपूर शहरात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 500 नवे रुग्ण (corona new patients) आढळल्यानं चिंतेत भर पडली आहे. सोबतच पाच कोरोना रुग्णांचा आज दिवसभरात मृत्यू  (death of 5 corona patients) झाला आहे. यात शहरातील तीन आणि ग्रामीण भागातील दोघांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, गेल्या आठवडाभरात नागपूरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढते आहे. एकीकडे राज्याची कोरोना आकडेवारी कमी होत असताना विदर्भात मात्र रुग्णसंख्या वाढत आहे. नागपुरात 4 हजार 881 चाचण्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यातून समोर आलेली ही रुग्णांची आकडेवारी आहे. आतापर्यंत एकूण 11 लाख 4 हजार 522 जणांच्या तपासण्या झाल्या आहेत. यातल्या 1 लाख 36 हजार 998 जणांना कोरोनाची बाधा झालेली होती. शासनानंसुद्धा ही बाब अतिशय गांभीर्यानं घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनीही व्हीसीच्या माध्यमातून यांदर्भात सूचना केल्या होत्या. आज मुख्यमंत्र्यांचे कोरोनाविषयक सल्लागार दीपक म्हैसेकर यांनी यासंदर्भात नागपूरमध्ये उचस्तरीय बैठक घेत आढावा घेतला. यावेळी म्हैसेकर यांनी नागपुरात रुग्णसंख्या तातडीनं कमी झाली पाहिजे असं सांगत चाचण्यांची संख्या वाढवण्यासह जनजागृतीसाठी मोहीम हाती घेण्याचे निर्देश दिले. हेही वाचा महाराष्ट्रातील या 3 शहरात वाढतो आहे कोरोनाचा धोका; सावध राहा आणि नियम पाळा सोबतच कोरोनाचा संसर्ग होऊन बरे झालेल्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. तेव्हा पोस्ट कोव्हीड सेंटर्स अधिक सक्षम करावेत. या रुग्णाच्या मानसिक शारीरिक समस्यांचं तात्काळ व्हावं, त्यांना गरजेचे उपचार मिळावेत असंही त्यांनी सांगितलं. बचत भवन इथं ही बैठक घेण्यात आली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या