JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / व्हॉट्सअॅप ग्रुपवर चिडवत होते मित्र, कॉलेज तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

व्हॉट्सअॅप ग्रुपवर चिडवत होते मित्र, कॉलेज तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

महाविद्यालयातील मित्रांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवरून जीतला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप त्याच्या वडिलांनी केला आहे.

जाहिरात

यात मिळालेल्या माहितीनुसार, आत्महत्या करणाऱ्यांमध्ये वृद्धांची संख्या सातत्यानं वाढत आहे. त्याचबरोबर महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्येही आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे ही एक भारतीयांसाठी चिंतेची बाब आहे.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

वसई,26 फेब्रुवारी: मानसिक तणावातून वसईत एका कॉलेज तरुणाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. वसई पूर्वेतील वसंत नगरी येथील पारस सोसायटीत ही घटना घडली आहे. जीत दर्शन असार (वय-18) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. महाविद्यालयातील मित्रांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवरून जीतला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप त्याच्या वडिलांनी केला आहे. याबाबत पोलिसांनी माहिती देण्यात आली असून जीतच्या मित्रांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवरील संभाषण तपासण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. सावरकरांच्या पुण्यतिथीलाच विधान परिषदेत भाजपचा उडाला फज्जा! याबाबत मिळालेली माहिती अशी की, जीत याने मानसिक तणावातून राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या करून आपलं आयुष्य संपवलं. याबाबत तुळींज पोलिस स्टेशनमध्ये अकास्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जीत हा मुंबई सांताक्रूज येथील रहेजा महाविद्यालयात बीएमएमच्या प्रथम वर्षात शिकत होता. सातत्याने येणाऱ्या मानसिक तणावामुळे त्याने आत्महत्या केल्याचे त्याच्या कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले आहे. मात्र, या घटनेनंतर त्याच्या कुटुंबीयांनी जीत याचा मोबाईल तपासला असता त्याच्या महाविद्यालयातील मित्रांच्या व्हॉट्सअॅपच्या ग्रुपवर आत्महत्येला प्रवृत्त करणाऱ्या विविध प्रकारच्या संभाषण आढळून आले आहे. याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम गँगच्या हस्तकाला नालासोपाऱ्यात अटक जीत हा अतिशय शांत स्वभावाचा होता. अभ्यासातही हुशार होता. जीतच्या मित्रांने ‘नमुने’ नावाचा व्हॉट्सअॅप गृप बनवला आहे. त्यात मस्करीत जितला सर्वजन चिडवत असल्याचे समोर आले आहे. परंतु त्याचे मित्र केवळ त्याच्याकडे काही काम असेल तेव्हा त्याला ग्रुपमध्ये सामावून घेत होते व काम झाले की पुन्हा ग्रुपमधून काढून टाकत होते, असे जीतचे वडील दर्शन असार यांनी सांगितले आहे. दरम्यान, आता याप्रकरणी पोलिस तपास घेत असून जीतने नेमके कशामुळे आत्महत्या केली, हे अद्याप समजू शकले नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या