JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / विनायक मेटेंचा मृत्यू अपघात का घातपाताने? संशय वाढल्याने मुख्यमंत्र्यांचे CID चौकशीचे आदेश

विनायक मेटेंचा मृत्यू अपघात का घातपाताने? संशय वाढल्याने मुख्यमंत्र्यांचे CID चौकशीचे आदेश

विनायक मेटेंच्या यांच्या अकाली निधनामुळे अनेक प्रश्न उपस्थितीत झाले आहे. मेटेंच्या गाडीला नेमका कशामुळे अपघात झाला हे अजून समोर आलेले नाही.

जाहिरात

Vinayak Mete Accident

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 17 ऑगस्ट : शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष आणि माजी आमदार विनायक मेटे यांच्या मृत्यूची सीआयडी चौकशी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस महासंचालकाना रजनीश सेठ यांना दिलेले आहेत. मराठा समाजाचे नेते अशी ओळख असलेल्या विनायक मेटे यांच्या गाडीला 14 ऑगस्ट रोजी पहाटे पाच वाजता मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात झाला होता. या अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने नवी मुंबईतील एम जी एम रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली होती. त्यावेळीच प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी या मृत्यूची सखोल चौकशी करण्यात येईल असे जाहीर केले होते.  त्यानुसार आज त्यांनी राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांना या मृत्यूची सीआयडी चौकशी करून आपला निष्कर्ष सादर करण्याचे आदेश दिलेले आहेत. विनायक मेटे यांच्या निधनानंतर काही प्रश्न उपस्थितीत झाले आहेत. मेटेंच्या अपघातापूर्वी 3 ऑगस्टला पुणे एक्स्प्रेसवर शिक्रापूरजवळ एका गाडीने त्यांचा पाठलाग केला होता. त्यांचा ड्रायव्हर चालक समाधान वाघमारे याने शिक्रापूर रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासा त्यामधून बरंच काही बाहेर येईल, असं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी त्या कारचालकाला ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ( विनायक मेटेंच्या गाडीचा पाठलाग करणारा ताब्यात, पोलीस चौकशी सुरू ) विनायक मेटेंच्या यांच्या अकाली निधनामुळे अनेक प्रश्न उपस्थितीत झाले आहे. मेटेंच्या गाडीला नेमका कशामुळे अपघात झाला हे अजून समोर आलेले नाही. तर दुसरीकडे त्यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांनी काही आरोप केले आहे, त्यामुळे मेटे यांचा अपघात आहे की घातपात याची चर्चा रंगली आहे. तर मेटेंचा चालक समाधान वाघमारे यांनी वेगळाच खुलासा केला आहे. ‘पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर परिसरात रस्त्यावर असणारे सीसीटीव्ही फुटेज तपासा, त्यामधून बरंच काही बाहेर येईल. अशी प्रतिक्रिया समाधान वाघमारे यांनी दिली आहे. समाधान वाघमारे हे विनायक मेटे यांच्याकडे चालक म्हणून काम करत होते. मात्र 14 तारखेला त्यांच्या वडिलांचे वर्षश्राद्ध होतं, त्यामुळं ते सुट्टीवर होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या