मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्य अधिकारी OSD डॅाक्टर राहुल गेठे यांना माओवाद्यांची जीवे मारण्याची धमकी दिली
मुंबई, 01 नोव्हेंबर : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठोपाठ आता त्यांचे विशेष कार्य अधिकारी डॅा.राहुल गेठे यांनाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. माओवाद्यांनी एक पत्र प्रसिद्ध करून ही धमकी दिली आहे. त्यामुळे तपास यंत्रणा अलर्ट झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्य अधिकारी OSD डॅाक्टर राहुल गेठे यांना माओवाद्यांची जीवे मारण्याची धमकी दिली आहे. डॅाक्टर राहुल गेठे यांना त्यांच्या घरी माओवाद्यांनी लाल शाईने लिहिलेले धमकीचे पत्र मिळाले आहे. या पत्रात माओवाद्यांनी डॅाक्टर राहुल गेठे यांना जीवे मारण्याती धमकी दिली आहे. (16 लाखांचे बक्षीस असलेल्या 2 माओवाद्यांचा खात्मा, जवानांनी मोठी कारवाई) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गेली पाच वर्षे डॅाक्टर राहुल गेठे विशेष कार्य अधिकारी OSD म्हणून कार्यरत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री असताना त्यांनी नक्षलग्रस्त भागात अनेक विकासांची कामे सुरू केली होती. या विकास कामांची अंमलबजावणी करून ती वेगात पुर्ण करण्याची जबाबदारी विशेष कार्य अंधिकारी म्हणून राहुल गेठे यांच्यावर होती. त्यावेळी माओवाद्यांनी राहुल गेठे यांना त्यांच्या कामात अडथळा निर्माण करत विकास कामे सुरू न करण्यासाठी धमक्या दिल्या होत्या. आता मुख्यमंत्री झाल्यावरही एकनाथ शिंदे यांनी गडचिरोली जिल्ह्यातील विकास कामे वेगाने करण्याचे आदेश दिले आहे. (वीज पुरवठा खंडीत होताच 20 वर्षीय मुलाचा खून, कोल्हापुरातल्या घटनेने खळबळ) त्यानुसार, राहुल गेठे यांनी अंमलबजावणी करण्यास सुरूवात केली होती. त्यामुळे पुन्हा एकदा नक्षलवाद्यांनी राहुल गेठे यांना टार्गेट करत जीवे मारण्याची धमकी पत्र त्यांच्या घरी पाठवलं आहे. माओवाद्यांनी धमकी पत्रात काय लिहिलं? जय लाल सलाम जय किसान डॅाक्टर राहुल गेठे को आखरी चेतावणी… एकनाथ शिंदे का ॲाफिसर डॅाक्टर राहुल गेठे बहुत उड रहा है. हमारा नुकसान गडचिरोली मे बहुत कर रहा है. हम हमारे भाईयों का बदला जलद ही लेने वाले है. उसकी मौत का एलान निकल चुका है. महाराष्ट्र सरकार को उसकी जबाबदारी जितना लेना हे ले लो. जय नक्षलवाद