JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / मोठी बातमी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचले मिलिंद नार्वेकरांच्या घरी

मोठी बातमी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचले मिलिंद नार्वेकरांच्या घरी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या घरी जावून गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 1 सप्टेंबर : महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. खरंतर राज्याच्या राजकारणात ट्विस्ट निर्माण करणारीच ही घटना आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या घरी जावून गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अतिशय जवळचे निकटवर्तीय म्हणून ते ओळखले जातात. त्यांनी अनेक वर्ष उद्धव ठाकरे यांचं स्वीय सहाय्यक म्हणून काम पाहिलेलं आहे. सध्याच्या काळात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि शिंदे गट यांच्यात राजकीय वैर उभं राहिलेलं आहे. अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय असलेले मिलिंद नार्वेकर यांच्या घरी एकनाथ शिंदे यांनी भेट दिली आहे. त्यामुळे विविध राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर ते त्यांच्या समर्थक आमदारांना घेवून सूरतमध्ये गेले होते. तिथे ते एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये थांबले होते. त्यावेळी त्यांची मनधरणी करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी आपले विश्वासू नेते मिलिंद नार्वेकर यांना सूरतला पाठवलं होतं. मिलिंद नार्वेकर यांनी त्यावेळी सूरत येथे जावून एकनाथ शिंदे यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला होता. मिलिंद नार्वेकर यांना तेव्हा सुरुवातीला हॉटेलमध्ये प्रवेश मिळत नव्हता. त्यानंतर त्यांची शिंदे यांच्यासोबत थोडावेळ चर्चा झाली होती. या चर्चेत शिंदेंनी परत येण्यास नकार दिला होता. त्यानंतर एकनाथ शिंदे आणि मिलिद नार्वेकर यांची आज भेट झाली. ( राज ठाकरेंसोबत आनंद दिघे, बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणींना उजाळा, भेटीदरम्यान मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंबद्दल बोलणं टाळलं? ) मुख्यमंत्र्यांची राज ठाकरेंच्या निवासस्थानी भेट दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जावून त्यांच्या घरच्या बाप्पाचं दर्शन घेतलं. मुख्यमत्र्यांनी राज ठाकरेंच्या भेटीनंतर प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. त्यावेळी त्यांनी आपल्या भेटीचा कोणताही राजकीय अर्थ काढण्यात येवू नये, असं आवाहन केलं. राज ठाकरे यांच्यावर काही दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. याशिवाय गणेशोत्सवानिमित्ताने आम्ही एकमेकांच्या घरी जातो. त्यामुळे आपण राज ठाकरे यांच्या घरी जावून गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदेंनी दिली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या