JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 'शिंदे गटाचे आमदार नाराज असतील तर मुख्यमंत्र्यांनी...'; चंद्रशेखर बावनकुळेंची महत्त्वाची प्रतिक्रिया

'शिंदे गटाचे आमदार नाराज असतील तर मुख्यमंत्र्यांनी...'; चंद्रशेखर बावनकुळेंची महत्त्वाची प्रतिक्रिया

उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत बावनकुळे म्हणाले, की मला असं वाटतं की उद्धवजींनी जे मोठे मोठे भाषण केले त्यातून काही होणार नाही, तर शिवसेनेत अजूनच खिंडार पडणार आहे

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अविनाश कानडजे, औरंगाबाद 23 सप्टेंबर : महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिंदे आणि फडणवीस सरकारचं कौतुक करत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. मंत्रिमंडळ विस्तारावरुन शिंदे गटातील आमदार नाराज असल्याची चर्चा आहे. यावर प्रतिक्रिया देत ते म्हणाले, की शिंदे गटाचे मंत्री नाराज असतील तर त्यांना कोणते खाते द्यायचे हा मुख्यमंत्र्यांचा प्रश्न आहे. आमदार नाराज असल्याचा प्रोपोगंडा तयार केला जात आहे. Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात शिंदे व फडणवीस सरकार बुलेट ट्रेनच्या वेगाने काम करतंय उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत बावनकुळे म्हणाले, की ‘मला असं वाटतं की उद्धवजींनी जे मोठे मोठे भाषण केले त्यातून काही होणार नाही, तर शिवसेनेत अजूनच खिंडार पडणार आहे. जुन्या सरकारपेक्षा शिंदे-फडणवीस सरकार कधीही चांगलं आहे. 18 तासापेक्षा जास्त वेळ काम करणारे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राज्याला मिळाले आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येक कोपऱ्याचा अभ्यास देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी केला आहे. त्यामुळे विकास जलद गतीने होणार’, असं बावनकुळे म्हणाले. महाविकास आघाडीवर निशाणा साधत ते म्हणाले, की ‘आमच्या सरकारने शेतकऱ्यांची वीज कापण्याचं पाप केलं नाही. पुढच्या तीन-चार वर्षांमध्ये शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळाली पाहिजे यासाठी प्रयत्नशील आहोत. शेतकऱ्यांना 12 तास वीज देण्यासाठी मुख्यमंत्री सहभागी योजना राज्यभर राबवणार आहोत, तशी योजना देवेंद्र फडणवीस यांनी बनवली आहे’, असंही ते म्हणाले. Raj Thackeray : राज ठाकरेंची गर्जना, ‘प्रगत म्हणवणाऱ्या महाराष्ट्रात ह्या घटना आढळणं हे राज्याला शोभणारं नाही’ यावेळी बोलताना त्यांनी राज ठाकरेंचं कौतुक करत उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. राज ठाकरे दिलदार नेता आहे. मैत्रीसाठी ते दिलदार नेता आहेत, असं ते म्हणाले. उद्धव ठाकरे कसे आहेत? असा प्रश्न केला असता बावनकुळेंनी स्मितहास्य दिलं. ते म्हणाले, की ‘त्यांच्याबरोबर मैत्रीचा खूप प्रयत्न केला पण त्यांना पवार साहेबांनी आणि काँग्रेसने बाजूला केलं. उद्धव ठाकरे यांनी अमित शाहांबद्दल जपून बोललं पाहिजे कारण सूर्यासमोर दिवा असा हा सामना आहे. उद्धव ठाकरे यांची अशी परिस्थिती होणार आहे की, माझे कुटुंब माझी जबाबदारी. घरातील चारजण फक्त सोबत राहतील. उद्धव ठाकरे यांना अंधारमय जीवन दिसत आहे. शरद पवार त्यांना दिवा दाखवत आहेत, असा टोला बावनकुळेंनी लगावला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या