JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / अखेर दिल्लीत ठरला मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त, 'या' दिवशी होणार शपथविधी!

अखेर दिल्लीत ठरला मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त, 'या' दिवशी होणार शपथविधी!

गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत बुधवारी रात्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत महत्त्वाची बैठक पार पडली.

जाहिरात

एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 15 डिसेंबर :  राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महत्त्वाची माहिती समोर येत आहे. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार हिवाळी अधिवेशनानंतर होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत महत्त्वाची बैठक झाली आहे. बुधवारी रात्री उशिरा अमित शाह यांच्यासोबत बैठक पार पडली. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाली असून, अधिवेशनानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अनेक दिवसांपासून मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा   गेल्या अनेक दिवसांपासून मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला आहे. हिवाळी अधिवेशनापूर्वीच शिंदे,फडणवीस सरकार मंत्रिमंडळाचा विस्तार करणार असल्याची चर्चा होती. मात्र हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळचा विस्तार होण्याची शक्यता दिसत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिवेशनासाठी आपल्याकडील अतिरिक्त खात्यांचा पदभार इतर मंत्र्यांकडे सोपवला आहे. त्यामुळे आता मंत्रिमंडळाचा विस्तार हा अधिवेशनानंतरच होणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. सूत्रांकडून देखील तशी माहिती समोर आली आहे. हेही वाचा :   महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद, बैठकीमध्ये महत्त्वाचा निर्णय, अमित शाहांनी सांगितला रोडमॅप! अमित शाह यांच्यासोबत बैठक  सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रिमंडळ विस्ताराबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत बैठक पार पडली. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाली असून, हिवाळी अधिवेशनानंतर मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता वर्तवली जात आहे. हेही वाचा :    कर्नाटकच्या ‘नो एण्ट्री’वर महाराष्ट्र आक्रमक, शाहांसमोरच बोम्मईंना सवाल, फडणवीस म्हणाले… विरोधकांची टीका   गेल्या अनेक दिवसांपासून मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला आहे. यावरून विरोधक सरकारवर हल्लाबोल करत आहेत. शिंदे गटातील प्रत्येक आमदाराला मंत्रिपद हवं आहे. जर अपेक्षा पूर्ण नाही झाल्या तर हे आमदार फुटतील, या भीतीने मंत्रिमंडळाचा विस्तार होत नसल्याचं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं होतं. तर याच मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील शिंदे, फडणवीस सरकारवर निशाणा साधला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या