गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत पोलिसांच्या सी 60 पथकाने अतुलनीय शौर्य दाखवून 26 नक्षलवाद्यांचा खात्मा केला.
गडचिरोली, 15 नोव्हेंबर : गडचिरोली (gadchiroli) जिल्ह्यातील कोलगुट-ग्यारापल्ली जंगलात 26 नक्षलवाद्यांना (26 Maoists killed) कंठस्नान घालण्याची मोठी कामगिरी पोलिसांच्या सी 60 कमांडो पथकाने (C-60 squad) पार पाडली. या धडाकेबाजी कामगिरीसाठी जिल्हा नियोजन फंडातून 51 लाख रुपये बक्षिस म्हणून देण्याचा जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. तसेच, निर्देश जिल्हाधिकारी संजय मीणा यांना दिले आहे. गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत पोलिसांच्या सी 60 पथकाने अतुलनीय शौर्य दाखवून 26 नक्षलवाद्यांचा खात्मा केला. या चकमकीत 4 पोलीस जवान देखील जखमी झाले होते. पालकमंत्री शिंदे यांनी नागपूरच्या ऑरेंज सिटी रुग्णालयात जाऊन या जवानांची भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यानंतर त्यांनी गडचिरोली येथे जाऊन सी 60 पथकातील पोलिसांची देखील भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी विशेष प्रशस्तीपत्रक देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. हे काय? कंगनाच्या वक्तव्यामुळे राखी सावंतला मोठा धक्का; हॉस्पिटलमध्ये झाली दाखल यानंतर झालेल्या बैठकीत त्यांनी गडचिरोली जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक अंकित गोयल आणि पोलीस महासंचालक संदीप पाटील यांच्याकडून या चकमकीची माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी या जवानांचे अभिनंदन करण्यासोबतच जिल्हा नियोजन समितीच्या फंडातून त्यांना 51 लाख रुपये बक्षीस म्हणून देण्यात येणार असल्याची घोषणा केली. पत्नी दिवसभर फोनवर बोलायची; तरुणाने पत्नीला दिला भयावह शिक्षा पोलिसांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी आपण त्यांचे अभिनंदन करण्यासोबतच त्यांना हे विशेष बक्षीस देत असल्याचे पालकमंत्री शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले. जिल्ह्यातील नक्षल पीडित बांधवांसाठी विशेष तरतूद करून उपाययोजना करणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी जाहीर केले. या जिल्ह्याची एक मागास आणि नक्षलग्रस्त जिल्हा ही ओळख बदलून टाकून इथल्या लोकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी यापुढेही शक्य ते सर्व प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.