JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Ratnagiri Accident News: कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर भीषण अपघात, कार थेट दरीत कोसळली

Ratnagiri Accident News: कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर भीषण अपघात, कार थेट दरीत कोसळली

Ratnagiri Accident News: कोल्हापूर - रत्नागिरी मार्गावर एक मोठा अपघात झाला आहे. अंबा घाटातून जाणारी कार थेट दरीत कोसळली आहे.

जाहिरात

कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर भीषण अपघात, कार थेट दरीत कोसळली

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

रत्नागिरी, 10 मार्च : रत्नागिरी जिल्ह्यातून (Ratnagiri district) एक मोठी बातमी समोर आली आहे. कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर (Kolhapur Ratnagiri road) एका कारला अपघात झाला आहे. या मार्गावरील अंबा घाटात कार थेट दरीत कोसळली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या कारमध्ये सहा प्रवासी होते. या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस, स्थानिक नागरिक मदतीसाठी दाखल झाले आहेत. (Car fell down in valley) घटनास्थळी स्थानिक नागरिकांच्या मदतीने मदत आणि बचावकार्य मोठ्या वेगाने सुरू आहे. घटनास्थळी हेल्प अकॅडमीचे कार्यकर्ते सुद्धा दाखल झाले आहेत. पोलीस आणि हेल्प अकॅडमीच्या पथकाकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे.

हा अपघात नेमका कसा आणि कशामुळे झाला याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर येऊ शकलेली नाहीये. तसेच गाडीत नेमके किती प्रवासी होते, ते कुठले निवासी होते त्यांची नावे या संदर्भात अद्याप कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये. पण गाडीत सहा प्रवासी असल्याचं बोललं जात आहे. आंबा घाट नेमका कुठे? कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा आंबा घाट आहे. रत्नागिरी आणि कोल्हापूर या दोन्ही जिल्ह्यांच्या सीमेवर हा घाट आहे. हा घाट खूपच वळणा-वळणाचा आहे. हा घाट समद्र सपाटीपासून दोन हजार किमी अंतरावर असून निर्सगरम्य वातावरण आणि पर्यटनासाठी खूपच प्रसिद्ध आहे. येथे पर्यटनासाठीही मोठ्या प्रमाणात नागरिक येत असतात. स्विफ्ट कार 300 फूट दरीत कोसळली जानेवारी महिन्यातही आंबा घाटात कार दरीत कोसळून अपघात झाला होता. आंबा घाटात कारचा भीषण अपघात झाला होता. या अपघातात स्विफ्ट कार थेट 300 फूट खोल दरीत कोसळली होती. अपघाताची माहिती मिळताच घनाटस्थळी पोलीस पथक दाखल झाले. घटनास्थळी पोलिसांकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले होते. 200 मीटर दरीत कोसळली कार दोन महिन्यांपूर्वी कोल्हापुरात एक भीषण अपघात झाला होता. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल ते मुरगूड रस्त्यावर हा अपघात झाला होता. अपघातानंतर गाडी थेट दरीत कोसळली. या अपघातात कारने पेट घेतला आणि यामध्ये एका व्यक्तीचा होरपळून मृत्यू झाला होता. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कागल - मुरगूड रस्त्यावर वाघजाई घाडात हा अपघात झाला होता. सकाळी धावत्या कारमध्ये एक स्फोट झाला आणि त्यानंतर ही गाडी थेट दोनशे मीटर दरीत जाऊन कोसळली असं बोललं जात आहे. यामुळे कारने पेट घेतला आणि एका व्यक्तीचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या