JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 'दोघांचा आवडता एकच शब्द, मंत्रिमंडळ...' अजितदादांचा शिंदे-फडणवीसांना सणसणीत टोला

'दोघांचा आवडता एकच शब्द, मंत्रिमंडळ...' अजितदादांचा शिंदे-फडणवीसांना सणसणीत टोला

‘महाविकास आघाडीचं काम सुरू आहे. अधिवेशनात एकत्रित काम करणार आहोत. नाना पटोलेंनी काय बोलायच हे त्यांनी ठरवावं.

जाहिरात

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 13 ऑगस्ट : ‘मंत्रिमंडळ विस्तार लवकरात लवकर होईल’ हा दोघांचा आवडता शब्द झाला आहे. आता खूपच लवकर करा कारण अधिवेशनात उत्तर द्याव लागेल. पालकमंत्री नेमले नाहीत, त्यामुळे जिल्ह्यांमध्ये ध्वजारोहण हे पालकमंत्र्यांविनाच होणार आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते अजित पवार (ajit pawar) यांनी शिंदे सरकारवर केली. अजित पवार आज पुण्यात जिल्हा बँकेच्या बैठकीसाठी आले होते. यानंतर पत्रकार परिषद घेऊन अजित पवार यांनी शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपावर टीका केली आहे. शिवसेनेमध्ये जे काही झालं ते सामान्य नागरिकांना आणि शिवसैनिकांना आवडलेलं नाही. ज्यांना निवडून आणलं ते टर्म संपेपर्यंत राहतात. पण सेनेचा इतिहास आहे, जे बंडखोरी करून बाहेर पडत असतात, ते परत निवडून येत नाहीत. छगन भुजबळ आणि नारायण राणे ही उदाहरण आहे, अशी आठवणच अजितदादांनी बंडखोरांना करून दिली. ( कश्मिरी पंडितांचा हत्यारा बिट्टा कराटेच्या पत्नीसह चौघांविरोधात मोठं पाऊल ) ठराविक उद्योगपतींच्या कुटूबांचं कर्ज माफ केलं जातंय. सर्वसामान्यांच्या कर्जाला मात्र पन्नास प्रश्न हे होता कामा नये कठोर कारवाई करायला हवी. देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष झाली आहे. मशाल मिरवणूक काढायची आहे आता पालकमंत्री नाहीत, असंही अजितदादा म्हणाले. ( जळगावात सैराट! अल्पवयीनं भावाकडून बहीण आणि तिच्या प्रियकराची हत्या ) ‘महाविकास आघाडीचं काम सुरू आहे. अधिवेशनात एकत्रित काम करणार आहोत. नाना पटोलेंनी काय बोलायच हे त्यांनी ठरवावं. त्यांच्याबद्दल काय भूमिका आहे, काँग्रेस पक्ष मांडेल. पण वेगवेगळ्या विचारधारेचे असून ही आम्ही एकत्र आहोत. मजबुतीने सरकार चालवलं आता विरोधातही एकत्र राहू, असंही अजितदादा म्हणाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या