JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / गाणं काही कळलं नाही, पण गिरीश महाजन सॉलिड नाचले, VIDEO

गाणं काही कळलं नाही, पण गिरीश महाजन सॉलिड नाचले, VIDEO

धुळे जिल्हा पोलिसांच्या वतीने हिट धुळे फिट धुळे मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

जाहिरात

धुळे जिल्हा पोलिसांच्या वतीने हिट धुळे फिट धुळे मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

दीपक बोरसे, प्रतिनिधी धुळे, 05 फेब्रुवारी : भाजपचे संकटमोचक नेते म्हणून ओळखले जाणारे गिरीश महाजन यांचा नवीन अंदाज आज पाहण्यास मिळाला. धुळे शहरात संपन्न झालेल्या हिट धुळे फिट धुळे या मॅरेथॉन स्पर्धेत क्रीडामंत्री गिरीश महाजन यांनी झुम्बा डान्स केला. त्यांचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. धुळे जिल्हा पोलिसांच्या वतीने हिट धुळे फिट धुळे मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेमध्ये स्पर्धकांचा उत्साह वाढवण्यासाठी झुम्बा डान्स आयोजित करण्यात आला होता.

संबंधित बातम्या

सकाळी साडेपाच वाजता मंचावर झुंबा डान्स सुरू झाला. त्यावेळेस गिरीश महाजन यांनी मंचावरती हजेरी लावली. त्याच वेळेस इतर स्पर्धाकांसोबत आणि आयोजकांसोबत गिरीश महाजन यांनी मंचावरती झुम्बा डान्सवर ठेका धरला. (कसबा पोटनिवडणुकीवरून भाजपने नाराजीचा उद्रेक, उमेदवारी न मिळाल्यामुळे शैलेश टिळक स्पष्टच बोलले) महाजन यांनी ठेका धरल्याचा पाहताच आमदार जयकुमार रावल आणि त्यांच्या अन्य सहकाऱ्यांना देखील मग राहावलं नाही. मग काय गिरीश महाजन यांच्यासोबत आमदार रावल आणि पदाधिकाऱ्यांनीही मंचावर झुंबा डान्स केला. ( अजूनही मला काही प्रकरणांमध्ये अडकवण्याचा डाव, एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट ) महाजनांचा झुबा डान्स पाहून इतर स्पर्धकांनाही चेव सुटला आणि त्यांनीही झुंबा डान्समध्ये सहभाग नोंदवला. त्यामुळे या स्पर्धेमध्ये गिरीश महाजन यांचा झुंबा डान्स हा चांगलाच चर्चेचा विषय ठरला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या