JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / नववर्षासाठी किरीट सोमय्यांचा जुनाच संकल्प, पण ठाकरेंचं वाढणार टेन्शन!

नववर्षासाठी किरीट सोमय्यांचा जुनाच संकल्प, पण ठाकरेंचं वाढणार टेन्शन!

आज वर्षाचा शेवटचा दिवस आहे. उद्यापासून नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे. नववर्षानिमित्त अनेकजण वेगवेगळे संकल्प करतात. असाच एक संकल्प आता भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 31 डिसेंबर :  आज वर्षाचा शेवटचा दिवस आहे. उद्यापासून नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे. नववर्षानिमित्त अनेकजण वेगवेगळे संकल्प करतात. असाच एक संकल्प आता भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. मात्र सोमय्या यांचा हा संकल्प ठाकरे गटाच्या अडचणी वाढवणारा ठरवू शकतो. त्यांनी ट्विट करत एकप्रकारे ठाकरे गटाला इशाराच दिला आहे. ‘उद्यापासून सुरू होणाऱ्या नवीन वर्षांत ठाकरे परिवाराचे 19 बंगले, अनिल परब यांचे साई रिसॉर्ट,  किशोरी पेडणेकर यांची एस आर ए सदनिका, मुंबई महापालिकेतील घोटाळा याचा सर्व हिशोब पूर्ण करणार’ असल्याचं किरीट सोमय्या यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

संबंधित बातम्या

सोमय्या यांनी नेमकं काय म्हटलं? किरीट सोमय्या यांनी नववर्षाच्या पार्श्वभूमीवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यामध्ये त्यांनी ठाकरे गटाला एकप्रकारे इशाराच दिला आहे.  उद्यापासून सुरू होणाऱ्या नवीन वर्षांत ठाकरे परिवाराचे 19 बंगले, अनिल परब यांचे साई रिसॉर्ट,  किशोरी पेडणेकर यांची एस आर ए सदनिका, मुंबई महापालिकेतील घोटाळा याचा सर्व हिशोब पूर्ण करणार असल्याचं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे. आता सोमय्या यांच्या या ट्विटमुळे पुन्हा एकदा भाजप आणि ठाकरे गटातील नेते आमने-सामने येण्याची शक्यता आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या