नारायण राणे यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे नगरपालिकेची राजकीय समीकरणे बदलली होती.
अलिबाग, 13 सप्टेंबर : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackery) यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्यामुळे भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (naryan rane) यांना अटक करण्यात आली होती. कोर्टाने दिलेल्या आदेश आणि अटीनुसार, अखेर आज नारायण राणे हे अलिबाग पोलीस स्टेशनला (alibag police station) हजर झाले होते. मागील वेळी राणे येऊ शकले नव्हते, पण यावेळी त्यांना हजर व्हावे लागले. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी 23 ऑगस्ट रोजी महाड येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्याच वक्तव्यावरुन त्यांना महाड एमआयडीसी पोलिसांनी संगमेश्वर येथून ताब्यात घेतलं होतं. 24 तारखेला त्यांना अटक झाली होती. त्यानंतर महाड दिवाणी कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायदंडाधिकाऱ्यांनी त्यांना काही अटी-शर्तीवर जामीन मंजूर केला होता. परंतु, या अटी शर्तीचे पालन करून नारायण राणे आज अलिबाग पोलिसांसमोर हजर झाले. 2 वर्षांमध्ये 6 चुका, विराटकडून रोहितकडे कॅप्टन्सी देण्यामागची Inside Story पोलीस स्टेशनला हजर झाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ‘मी पोलीस स्टेशनला आलो. न्यायालयाने जो आदेश दिला होता, त्याचे पालन करून आलो आहे. आदेशाप्रमाणे कोणताही जबाब नोंदवला नाही. रायगड पोलिसांनी सहकार्य केले. अलिबागचे जेवण सुद्धा चांगले होते, असं राणे म्हणाले. अलिशान बेडरूम, शाही भोजन आणि स्विमिंग पूल; दोस्तम यांच्या महालात तालिबानींची ऐश तर, राणेंची वकील संग्राम देसाई म्हणाले की, ‘मागच्या वेळी येणे शक्य नव्हते त्याची कारणे लेखी स्वरूपात दिले होते. नारायण राणे यांचा जबाब नोंदवला आहे, त्यांची जी चौकशी करायची होती ती त्यांनी केली. आम्ही पोलिसांना सर्व सहकार्य करू. व्हॉइस सॅम्पल आज घेतले नाही. पुढची तारीख काही सांगितली नाही, पोलिसांना आम्ही सहकार्य करू’ असं देसाई यांनी सांगितलं. विशेष म्हणजे, नारायण राणे हे गेट ऑफ इंडियावरून स्पीड बोटीने अलिबाग पोलीस अधीक्षक कार्यालयात हजर झाले होते.