मुंबई, 4 सप्टेंबर: माझी नार्को टेस्ट करण्याची या क्षणी तयारी आहे, असं प्रत्युत्तर भाजप नेते राम कदम यांनी काँग्रेसच्या मागणीला दिलं आहे. मात्र, अभिनेत्री कंगना रणौत ही जर ड्रग्स माफियांची नावं सांगाण्यास तयार असेल तर मग राज्य सरकार ती माहिती का घेत नाही आहे? यात राज्य सरकारचे कोणते नेते अडचणीत येणार आहेत? असा सवाल राम कदम यांनी उपस्थित केला आहे. कंगनाला धमकी…. कंगना हिनं गौप्यस्फोट केला तर राज्य सरकारमधील अनेक नेते अडचणीत येतील. म्हणून तिला मुंबईत येऊ नकोस, अशी धमकी दिली जात आहे. कंगनाला राज्य सरकारचा एकही मंत्री फोन करुन माहिती का घेत नाही आहे, असा सवाल देखील राम कदम यांनी ‘News18 लोकमत’शी संवाद साधताना उपस्थित केला आहे. हेही वाचा.. सप्टेंबरच्या सुरुवातीला कोरोनाचा प्रकोप, 24 तासांत 84 हजार नवीन रुग्णांची नोंद बॉलिवूड अभितेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून अभिनेत्री कंगणा रणौत हिनं मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप करत त्यांच्यावर अविश्वास दाखवला. तिच्यावर शिवसेनेने निशाणाही साधला आहे. नंतर मात्र कंगणाच्या सूरात सूर मिसळून भाजपचे नेते राम कदम यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली. राम कदम यांच्या या टिकेवर आता काँग्रेसनं पलटवार केला आहे. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांना राम कदम यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी कली आहे. काँग्रेसच्या आरोपाला उत्तर देताना राम कदम यांनी सांगितलं की, कंगना हिनं मुंबईबद्दल केलेलं वक्तव्य अयोग्य आहे. पण ती जो ड्रग्सचा मुद्दा मांडत आहे, तो महत्त्वाचा आहे. मात्र, कंगणा काय सांगू पाहात आहे, ते राज्य सरकार का ऐकून घेत नाही आहे. माझे बॉलिवूडशी संबंध असल्याचं सगळ्या जगाला माहिती आहे. माझ्यावर बालिश आरोप करण्यापेक्षा कंगना जी माहिती सांगू पाहत आहे, ते तर राज्य सरकारनं ऐकून घ्यायला हवं. देवेंद्र फडणवीसांचं नाव घेण्याचा काय अधिकार? कंगना व राम कदम यांचे बोलविते धनी असलेल्या देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्रद्रोही भाजपने विनाशर्त महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी, अशी मागणी सचिन सावंत यांनी केली आहे. मात्र, सचिन सावंत यांना फडणवीसांचं नाव घ्यायचा अधिकार नाही आहे. सचिन सावंत यांनी ट्वीट करून कंगणासह राम कदम यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सावंत म्हणाले की, ‘कंगना+भाजप IT सेल” कंगनाच्या ट्वीट, वक्तव्यांमागे भाजप आहे. या कृतघ्न महिलेच्या साथीनं राम कदम यांनी महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेचा, संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील 106 हुतात्म्यांचा, राणी लक्ष्मीबाईंचा व आमची मुंबईवर प्रेम करणाऱ्या या सर्वांचा घोर अपमान केला आहे. महाराष्ट्र ही शिवरायांची भूमी आहे. महाराष्ट्राचा सातत्याने जाणिवपूर्वक अपमान भाजप करत आहे. अजूनही भाजपाने कंगनाचा निषेध केला नाही. कंगना व राम कदम यांचे बोलविते धनी असलेल्या देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्रद्रोही भाजपने विनाशर्त महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी ही आमची मागणी आहे, अशी मागणी सचिन सावंत यांनी केली आहे. विवेक मोईत्रा यांच्यापासून राम कदम यांना ड्रग्स विक्री तसेच पुरवठ्याबाबत सर्व माहीत आहे. एवढं नाही तर कदम यांचे बॉलिवूडमधील इतरांशी जवळचे संबंध आहेत. त्यामुळे त्यांची नार्को टेस्ट करावी. भाजप कार्यालयात संदीप सिंग यानं तब्बल 53 वेळा कोणाशी संवाद साधला याबाबत चौकशी व्हायला हवी. यातून भाजप नेते आणि ड्रग्स माफियांचे संबंध उघड होतील, असं देखील सचिन सावंत यांनी सांगितलं आहे. संजय राऊत यांच्या टीकेनंतर कंगनाचा सवाल दरम्यान, अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर अनेक वक्तव्यांमुळे अभिनेत्री कंगना रणौत चर्चेत आली आहे. तिनं ट्विटरवरून देखील विविध व्यक्तींवर टीका करण्याची संधी सोडली नाही आहे. दरम्यान कंगनाने नुकतेच ट्वीट करत शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. तिने या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, ‘शिवसेना नेते संजय राऊत यांनी मला जाहीरपणे धमकी दिली आहे आणि मुंबईत न परतण्यास सांगितले आहे. आधी मुबंईच्या रस्त्यावर आझादी ग्राफिटीज आणि आता जाहीर धमकी मिळते आहे. ही मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी का वाटत आहे?’ हेही वाचा… रियाच्या घरी NCBचं सर्च ऑपरेशन सुरू, सॅम्युल मिरांडाला घेतलं ताब्यात शिवसेना नेता संजय राऊत यांनी शिवसेनेचे मुखपत्र सामनातून असे म्हटले होते, त्या मुंबईत राहतात आणि तरीदेखील इथल्या पोलिसांवर टीका करतात. त्यांनी असे म्हटले होते की, ‘मी त्यांना (कंगनाला) नम्र विनंती करतो की त्यांनी मुंबईत येऊ नये. हे मुंबई पोलिसांचा अपमान करण्याव्यतिरिक्त काही नाही आहे. गृह मंत्रालयाला यावर कारवाई करायला हवी’. कंगनाने काही दिवसांपूर्वी मुंबई पोलीस कमिशनर आणि मुंबई पोलिसांच्या कामकाजावर सवाल उपस्थित केले होते. तिने असा आरोप देखील केला होता की, CP मुंबई पोलिसांनी कंगनाबाबत चुकीचे वक्तव्य करणाऱ्याचे ट्वीट लाइक केले आहे. कंगनाचे याबाबत मुंबई पोलिसांबरोबर ट्वीटवॉर झाल्याचे देखील पाहायला मिळाले होते.