मुंबई, 8 जुलै: राज्यात कोरोनाचा विस्फोट झाला असताना मात्र दुसरीकडे शिवसेना आणि भाजप यांच्या आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरू आहेत. भाजपचे नेते आणि आमदार ॲड. आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सणसणीत टोला लगावला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे ज्येष्ठ नेते असूनही त्यांना मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी ‘मातोश्री’वर जावं लागतं, असं आमदार ॲड. आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. हेही वाचा… औरंगाबादेत शिवसेनेला दुसरा दुख:द धक्का, आणखी एका नगरसेवकाचा कोरोनामुळे मृत्यू ‘कुणाला किती वेळा, कुठे भेटावे? हा विषय त्यांचा असला तरी… आपण ज्या व्यक्तीला वारंवार बोलावून घेतो किंवा यायला लावतो. त्या व्यक्तीचे ज्येष्ठत्व, कर्तुत्व, सामाजिक स्थान आणि त्या व्यक्तीच्या प्रकृतीची काळजी याचे भान ठेवावेच लागते! इथे याबाबत “आनंदीआनंदच” आहे !’ अशा शब्दांत आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
दुसरीकडे, यूजीसीने घेतलेल्या निर्णयासंदर्भातील आपल्या शेवटच्या ट्वीटमध्ये भाजप आमदार आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. हेही वाचा… ही चिपळ्या वाजवायची वेळ आहे का? सेनेचा फडणवीसांना सणसणीत टोला आशिष शेलार म्हणाले, राज्य सरकार एटीकेटीच्या विद्यार्थ्यांना नापास करणार होते? ते सुदैवाने आता बचावले. आधी घोषणा, मग निर्णय, मग गृहपाठ यामुळे जो विद्यार्थ्यांना गेले तीन महिने मनस्ताप झाला. त्यामुळे विद्यार्थी भयभीत आहेत त्यांना संभ्रमातून बाहेर काढा. आता तरी सु-सूत्रे योग्य नियोजन करा, असा सल्ला देखील आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारला दिला आहे.