JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / कुटुंबावर काळाचा घाला; आजी आणि नातीनं जागीच गमावला जीव, आईची मृत्यूशी झुंज

कुटुंबावर काळाचा घाला; आजी आणि नातीनं जागीच गमावला जीव, आईची मृत्यूशी झुंज

कुटुंबातील इतर सदस्य जखमी झाले असून त्यांना शिरपूर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

भुसावळ, 18 नोव्हेंबर : भुसावळ येथील पवार कुटुंब रिक्षाने भुसावळहून इंदोरला भावबीजेसाठी जात असताना शिरपूर नजीक रिक्षाचा भीषण अपघात झाला. या अपघातात प्रमिला पवार (60) व त्यांची नात कनिष्का पवार (01) रा भुसावळ या दोन्ही ठार झाल्या. तर कुटुंबातील इतर सदस्य जखमी झाले असून त्यांना शिरपूर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. याबाबतचे अधिक वृत्त असे की, भुसावळचे स्वामी विहार, दत्त मंदीर भागातील राहणारे नारायण पवार हे अॅपे रिक्षाने त्यांच्या मुलीकडे इंदोर येथे परिवारासह जात होते. तेव्हा मंगळवारी दुपारी पावणेचार वाजता शिरपूरपासून 17 किमी अंतरावर हाडाखेड गावाजवळ आयशर ट्रकने रिक्षाला मागून धडक दिल्याने रिक्षा क्रमांक एम पी 46 आर 0417 मधील प्रमिला पवार व नात कनिष्का पवार यांचा मृत्यू झाला. हेही वाचा - 5 वर्षांच्या सुखी संसार एका वादाने संपला, पतीच्या आत्महत्येनंतर 6 दिवसांनी पत्नीने घेतला गळफास या अपघातात नारायण पवार (65) व शितल नरेश पवार (24), वेदीका नरेश पवार (04) दोन्ही रा भुसावळ, जितेंद्र नाना देशमुख (47) रा. टीकळी ता सेंदवा आणि रिक्षातील इतर जण जखमी असून त्यांच्यावर शिरपूर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती शिरपूर पोलीसांनी दिली आहे. दरम्यान, ऐन दिवाळी सणाच्या दिवसात पवार कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळल्याने भुसावळ परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या