सलग दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बीड जिल्ह्यातील जाहीर कार्यक्रमास पंकजा मुंडे यांनी टाळण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
बीड, 15 जानेवारी : महाराष्ट्रातील लाखो भावी भक्तांचे श्रद्धास्थान व राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा समजला जाणाऱ्या बीड जिल्ह्यातील गहीनाथगडावरील संत वामनभाऊ महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळा पार पडणार आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थितीत राहणार आहे. पण याा कार्यक्रमाल भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे या दोघी उपस्थित राहणार नाहीत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा या कार्यक्रमाला गैरहजर राहणार आहे. भाजपच्या नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे या गेल्या काही दिवसांपासून भाजपमध्ये नाराज असल्याचे बोलले जात आहे. आता बीडमध्ये फडणवीस यांच्या दुसरा कार्यक्रम होत आहे. पण, या कार्यक्रमाला आजारी असल्याने पंकजा मुंडे यांचा दौरा रद्द आहे. तर प्रितम मुंडे देखिल जिल्ह्यात नाहीत. त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चा रंगू लागली आहे. सलग दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बीड जिल्ह्यातील जाहीर कार्यक्रमास पंकजा मुंडे यांनी टाळण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. (Nitin Gadkari : नितीन गडकरींना आलेला धमकीचा फोन दुबई नाही तर.. प्रकरणाला नवीन वळण) संत वामनभाऊ यांचा 47 वा पुण्यतिथी सोहळा आहे. त्यानिमित्ताने गहिनीनाथ गडावर दर्शनासाठी राज्यातून लाखो भक्त येतात. याचनिमित्याने गहिनीनाथ गडावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील हजेरी लावणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा या सोहळ्याला येणार होते. पण, व्यस्त कार्यक्रमामुळे त्यांनी दौरा रद्द केला आहे. महोत्सवाची संपूर्ण तयारी पूर्ण झाली असून 6 ते 7 लाख भाविक गडावर जमण्याची शक्यता असून तब्बल 500 क्विंटल महाप्रसाद बनविण्यात आला आहे. या गडावर मुंडे भावंडं परंपरेनुसार एकाच व्यासपीठावर येतात. मात्र धनंजय मुंडेंचा अपघात झाल्याने यंदा धनंजय मुंडे हे गडावर जाणार नसल्याचे जाहीर करण्यात आले आहे. तर दुसरीकडे, पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे याा सकाळी दर्शनासाठी पोहचतील अशी शक्यता होती. पण प्रकृतीच्या कारणास्तव पंकजा मुंडे यांनी या कार्यक्रमाला जाण्याचं टाळलं. (शिंदे गटाच्या आमदार सोनवणेंना दिलासा, अपात्रतेबाबतची याचिका खंडपीठाने फेटाळली) मध्यंतरी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस हे बीडमध्ये आले होते. दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या संघटनेच्या वतीने व्यसनमुक्ती रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीला मात्र, पंकजा मुंडे गैरहजर होत्या. एवढंच नाहीतर राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हे औरंगाबाद दौऱ्यावर होते, त्यावेळी पंकजा मुंडे यांचं निमंत्रण पत्रिकेतून नाव वगळण्यात आलं होतं. या वादानंतर आज पंकजा मुंडे आणि फडणवीस हे एकाच व्यासपीठावर येणार आहे.