बीड, 26 सप्टेंबर : शहराचे ग्रामदैवत श्री खंडेश्वरी मोतेच्या शारदीय नवरात्र उत्सवास आजपासून घटस्थापनेने प्रारंभ झाला आहे. यंदा नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. मागील दोन वर्षांमध्ये कोविडचे सावट असल्यामुळे सार्वजनिक सण उत्सवावर निर्बंध होते. परंतु, आता हे सावट दूर झाल्याने भक्तांमध्ये उत्साह संचारला आहे. डोंगराळ परिसरात वसलेल्या खंडेश्वरी देवी मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त जत्रेचे स्वरूप आलेले आहे. आजपासून नवरात्री उत्सवाला प्रारंभ झाला आहे. पुढील नऊ दिवसांसाठी दुर्गा देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते. बीड करांचे ग्रामदैवत असणाऱ्या खंडेश्वरी देवीची यात्रा उत्सवाला देखील सुरुवात झालेली आहे. घटस्थापना जवळ आली की बीड करांना वेध लागतात ते खंडेश्वरी नवरात्रोत्सवाचे. शहरात पूर्वेला टेकडीवर विसावलेल्या खंडेश्वरीमातेचे नवसाला पावणारी देवी म्हणून ख्याती आहे. माहुरवासिनी रेणुकामाता काळोबा वीर नावाच्या मेंढपाळ भक्ताच्या विनंतीवरून बीडमध्ये आली. मंदिराचा परिसर सुमारे आठ एकरांचा आहे. अहल्यादेवी होळकरांनी हे मंदिर बांधले गेल्याचे सांगितले जाते. आजही काळोबा वीर यांची समाधी मंदिराच्या गाभाऱ्या समोर आहे. देवीने साक्षात्कार देऊन… काळोबावीर नावाचा मेंढपाळ मंदिर परिसरात वास्तव्यास होता. त्यांचा मुख्य व्यवसाय मेंढपाळण होता. दर पौर्णिमेला काळोबावीर माहूरच्या रेणुका देवीच्या दर्शनासाठी जात. वयामानाने ते थकले. घोड्यावर बसता येईना. यामुळे त्यांना दर्शनासाठी जाता आले नाही. मात्र, शेवटचे दर्शन घ्यावे यासाठी काळोबावीर माहूरला गेले. देवीसमोर प्रार्थना की, यापुढे मी दर्शनासाठी येऊ शकणार नाही. तेवढ्यात देवीने साक्षात्कार देऊन काळोबारीर यांना सांगितले, मी तुझ्या सोबत येते मात्र, तु पूढे चाल मागे वळून पाहू नकोस. जर मागे पाहशील तर त्याच ठिकाणी मी थांबेन.
Video : अखेर बीडमध्ये धावली रेल्वे!, काय म्हणतात सामान्य नागरिक? पाहा स्पेशल रिपोर्ट
काळोबावीर देवीने सांगितल्यानुसार पुढे चालू लागला. मात्र काही अंतर चालल्यावर काळोबावीरच्या मनात शंका आली. देवी खरच आपल्यामागे येते का हे पाहण्यासाठी तो मागे वळता. देवी त्याच ठिकाणी अदृश्य झाली आणि खडकाळ दगडातून स्वयंभू मूर्ती प्रकट झाली. 40 फुटी रावणाचे दहन पौर्णिमेनिमित्त या ठिकाणी मोठा उत्साह असतो. देवीला पुरणाचा नैवेद्य दाखवला जातो. नवरात्रीच्या नऊ दिवस जत्रा भरते. याच दिवसात प्रतिदिवशी 20 ते 25 हजार भक्त मातेचे दर्शन घेतात. सीमा उल्लंघनाच्या दिवशी या ठिकाणी 40 फुटी रावणाचे दहन केले जाते. यासह आराधी गाणे, जागरण गोंधळ केला जातो.
Navratri : गरब्यात नाचण्यासाठी मुलंही करतायत जय्यत तयारी, पाहा VIDEO
मंदिराची दिनचर्या भाविक भक्तांसाठी सकाळी पाच वाजता मंदिर खुले केले जाते. देवीची पूजा केली जाते. रात्री साडेआठ पर्यंत मंदिर भाविकांसाठी खुले असते. नवरात्रीनिमित्त शहरातील विविध मान्यवरांच्या हस्ते संध्याकाळी आठच्या सुमारास महाआरती केली जाते. मंदिर स्थळी कसे पोहोचाल बीडच्या बस स्थानकापासून स्थानिक ऑटोरिक्षाद्वारे मंदिरापर्यंत पोहोचला येईल. मोंढा परिसरात आकाशवाणी केंद्राच्या मागील बाजूस खंडेश्वरी देवीचे मंदिर आहे.
गुगल मॅपवरून साभार