JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / बहिणीच्या लग्नाचं कर्ज कसं फेडायचं? 20 वर्षीय शेतकरी भावाने केली आत्महत्या

बहिणीच्या लग्नाचं कर्ज कसं फेडायचं? 20 वर्षीय शेतकरी भावाने केली आत्महत्या

शेती न पिकल्याने वडिलांच्या नावे असलेले बँकेचे कर्ज व बहिणीच्या लग्नाचे कर्ज कसे फेडायचे, या विवंचनेतून टोकाचे पाऊल उचलले.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बीड, 01 नोव्हेंबर : परतीच्या पावसाच्या शेतीचं अतोनात नुकसान झाले असून बळीराजा हवालदील झाला आहे. बीडमध्ये गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांचं आत्महत्येचं सत्र सुरूच आहे. आज पुन्हा एकदा एका 20 तरुण शेतकऱ्याने आपलं जीवन संपवलं आहे. बहिणीच्या लग्नाचे कर्ज कसे फेडायचे, या विवंचनेतून 20 वर्षाच्या तरूण शेतकऱ्याने आत्महत्या केली. मागील तीन वर्षांपासून सतत शेती न पिकल्याने शेतकऱ्याच्या 20 वर्षीय मुलाने घरातील पत्र्याच्या आडूला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. बीडच्या केज तालुक्यातील देवगाव येथिल दीपक बालासाहेब मुंडे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. (बीडमध्ये शेतकऱ्यांचं आत्महत्येचं सत्र सुरूच, एकाच दिवसात 2 जणांनी संपवलं आयुष्य) शेती न पिकल्याने वडिलांच्या नावे असलेले बँकेचे कर्ज व बहिणीच्या लग्नाचे कर्ज कसे फेडायचे, या विवंचनेतून टोकाचे पाऊल उचलले. घरी कुणी नसल्याचे पाहून घरातील पत्र्याच्या लोखंडी आडूला दोरीच्या मदतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. केज पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. एकाच दिवशी 2 शेतकऱ्यांची आत्महत्या दरम्यान, बीड जिल्ह्यात शेतकरी आत्महत्याचं सत्र सुरूच आहे. अतिवृष्टीने उभे पिक उद्ध्वस्त झाल्याने, शेतकरी आत्महत्याकडे वळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. रविवारी एकाच दिवशी गेवराई तालुक्यात 2 शेतकऱ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या करत आपलं जीवन संपवलंय. अमोल रानमारे (वय 24 रा. धोंडराई ता. गेवराई) अर्जुन धोत्रे (वय 40 रा. भोगलगाव ता. गेवराईः असं आत्महत्या करुन जीवन संपविलेल्या शेतकऱ्यांची नावे आहेत. तर या दोन्ही शेतकऱ्यांनी अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झाले, यामुळे आत्महत्या केल्याचं समोर आले आहे. ( वीज पुरवठा खंडीत होताच 20 वर्षीय मुलाचा खून, कोल्हापुरातल्या घटनेने खळबळ ) तर, एक दिवसाआधीच अतिवृष्टी आणि परतीच्या पावसाने पिकाचे नुकसान झाले कुटुंब चालवायचे कसे यावे विवंचनेतून 30 वर्षीय शेतकऱ्याने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बीड औरंगपूर येथे घडली. नारायण सुंदर पडूळे असं मयत शेतकऱ्याचं नाव आहे. अतिवृष्टीमुळे कापसाचे पीक पाण्याखाली गेले बँकेचे कर्ज फेडायचे कसे या नैराश्यातून संबंधित शेतकऱ्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे नातेवाईकांनी सांगितलं. नारायण पडूळे हे अल्प भूधारक शेतकरी असून, त्यांच्याकडे दोन बँकेचे कर्ज आहे. कर्ज काढून कापसाची लागवड केली होती. मात्र गत आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे हातात तोंडाशी आलेल्या कापसाच्या वाती झाल्या. कापूस पाण्याखाली गेल्यामुळे आता बँकांचे कर्ज फेडायचे कसे? या विवंचनेतून नारायण पडूळे यांनी मृत्यूला कवटाळले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या