सुरेश जाधव (बीड), 22 डिसेंबर : बीड जिल्ह्यात सोशल मीडियावर एक आमंत्रण पत्रिका वायरल होत आहे. या पत्रिकेमध्ये 25 महिन्यापासून शेतात उभा असलेल्या उसाची होळी करणार असल्याचा हा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये चक्क शुभ हस्ते म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रमुख उपस्थिती देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री यांची नावे आहेत. या उसाच्या होळीच्या कार्यक्रमात त्यांची प्रमुख उपस्थिती असणार असल्याची ही पत्रिका चर्चेचा भाग ठरते आहे.
बीड जिल्ह्यातील तालुका माजलगाव या ठिकाणी 26 डिसेंबर 2022 रोजी दुपारी एक वाजता 25 महिन्यापासून शेतात उभा असलेल्या उसाची होळी पेटवण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते हा ऊस पेटवला जाणार असल्याची पत्रिका सध्या बीड जिल्ह्यात सर्वत्र पाहायला मिळत आहे. ही पत्रिका अन्यायग्रस्त शेतकरी गंगाधर थावरे आणि संग्राम गंगाधर थावरे या दोघांनी हा कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
हे ही वाचा : Solapur : पशुसंवर्धन विभागातील योजनांचा घ्या फायदा, लगेच करा अर्ज
मागील पंचवीस महिन्यापासून शेतात ऊस उभा असल्याने आणि जय महेश शुगर इंडस्ट्री पवारवाडी यांच्या राजकीय अट्टाहासापाई जवळपास पंधरा शेतकऱ्यांचा ऊस जाणीवपूर्वक त्या कारखान्याने नेला नाही. परिणामी शेतकऱ्यांचे यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
मात्र आता हे नुकसान सहन करण्यासाठी आम्ही तयार असून हा ऊस 25 महिन्यापासून शेतात उभा असल्याने उसाची होळी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा भव्य दिव्य कार्यक्रम आम्ही राबवला आहे.
हे ही वाचा : Kolhapur : शेतकऱ्यांना एकाच छताखाली मिळणार अनेक प्रश्नांची उत्तरं, 4 दिवस घ्या संधीचा लाभ
या कार्यक्रमाला जिल्ह्यातील सर्व नेतेमंडळी मान्यवर आणि नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन शेतकरी नेते गंगा थावरे आणि अन्यायग्रस्त शेतकरी म्हणून गंगा विषम थावरे यांनी हे आव्हान केले आहे. या सगळ्या बातमीमुळे सध्या जिल्हाभरात खळबळ उडाली आहे. आता या कार्यक्रमाला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हजर राहणार का? यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळणार का? हे पाहणं गरजेचं आहे.