JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Bachchu Kadu : बच्चू कडूंचा उद्धव, राज आणि आदित्य ठाकरेंवर ‘प्रहार’

Bachchu Kadu : बच्चू कडूंचा उद्धव, राज आणि आदित्य ठाकरेंवर ‘प्रहार’

अमरावतीच्या धामणगाव रेल्वे तालुक्यातील पिंपळखुटा येथे आयोजित कार्यक्रमात कडू यांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अमरावती, 14 डिसेंबर : अपक्ष आमदार बच्चू कडू हे नेहमी आपल्या वक्तव्याने चर्चेत असतात. अमरावतीच्या धामणगाव रेल्वे तालुक्यातील पिंपळखुटा येथे आयोजित कार्यक्रमात कडू यांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे. केवळ भाषण दिल्याने मत मिळत नाही अशी मिश्किल टीका बच्चू कडू यांनी केली आहे. मनसेच्या 13 आमदारांना नागरिक आता विसरले आहेत. मात्र बच्चू कडू जनतेचा आशीर्वाद आहे म्हणून अपक्ष आमदार म्हणून मला 4 वेळा निवडून दिले असे मत बच्चू कडूंनी व्यक्त केल. जात आणि धर्म लावला तर पक्ष लवकर वाढते, मात्र बच्चू कडू जाती पातीचे व धर्माचे राजकारण करत नसल्याचे स्पष्ट केले.

बच्चू कडूंनी दिव्यांग बांधवांच्या भावना व्यक्त केल्या यावेळी दिव्यांग बांधवांच्या वेदना, समजत काम करण्यासाठी बच्चू कडू राज्यभर फिरले. दिव्यांगासाठी कार्य करत असताना बच्चू कडूंवर 350 हून अधिक गुन्हे दाखल झाले असे बोलताना बच्चू कडू यांनी राज, उद्धव आणि आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला. ठाकरे कुटुंबीयांवर आजपर्यंत किती गुन्हे दाखल आहेत असा सवाल केला. केवळ गोड बोलण्याने आणि फेसबुकवर राहल्याने मतं मिळत नाही अशी टीका बच्चू कडूंनी केली आहे.

हे ही वाचा :  सुषमा अंधारेंविरोधात वारकरी संघटना आक्रमक; काल शपथ तर आज तक्रार दाखल

संबंधित बातम्या

जात आणि धर्म लावला तर पक्ष वाढवायला वेळ लागत नाही. सहज पक्ष वाढतो असेही बच्चू कडू यावेळी म्हणाले. आपण मनसे पाहिला असेल, ते मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा असे म्हणायचे. केवळ बोलण्यानं मते मिळत नसतात असे कडू म्हणाले. मनसेच्या 13 आमदारांना महाराष्ट्र आता विसरुन गेला असल्याचे बच्चू कडू म्हणाले. मी चार वेळा निवडून आलो आहे.  

जाहिरात

जातीचं सोंग नाही, जातीचा झेंडा नाही, धर्माचा झेंडा नाही, कोणताही नेता बोलावला नाही. तुमच्यासारख्या सामान्य माणसांनी देशात इतिहास केला. अपक्ष माणूस एकदा नाहीतर चार वेळा निवडून दिला असल्याचे कडू म्हणाले. माझं काम बघूनच तुम्ही मला निवडून दिल्याचे कडू म्हणाले.

हे ही वाचा :  …म्हणून शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी दिली; पकडलेल्या आरोपीचा अजब दावा

जाहिरात

ज्याला हात नाही, पाय नाही, डोळे नाही, ज्याला ऐकू येत नाही त्यांच्यासाठी मी महाराष्ट्रभर फिरलो आहे. या सर्व वेदना विधानसभेत मी मांडल्या आहेत माझ्यावर 350 गुन्हे दाखल झाले असल्याचे बच्चू कडू यावेळी म्हणाले.  राज ठाकरेंना, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना विचार बर किती गुन्हे दाखल आहेत? असा सवालही बच्चू कडूंनी या सभेत बोलताना केला.  

जाहिरात

फक्त फेसबूकवर गोड गोड बोलून मतं मिळत नाही असेही ते म्हणाले. बोल बच्चन करुन काही होत नाही. कर्म, कर्तव्य करणं गरजेचं आहे. कष्ट करावं लागते असेही कडू म्हणाले. जात आणि धर्म लावला तर पक्ष वाढवायला वेळ लागत नाही. पक्ष सहज पक्ष वाढतो असेही बच्चू कडू यावेळी म्हणाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या