JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 'राम मंदिर शिलान्यासचं श्रेय साधु-संतांना, बाबरी मशिदीचा खटला आता ठरणार निरर्थक'

'राम मंदिर शिलान्यासचं श्रेय साधु-संतांना, बाबरी मशिदीचा खटला आता ठरणार निरर्थक'

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती हे सर्वजण आरोपातून मुक्त होतील

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नागपूर, 5 ऑगस्ट: अयोध्येत होत असलेले प्रभु श्री रामाचे मंदिर ही सर्वांसाठी आनंदाची बाब आहे. राम मंदिराच्या शिलान्यासचं संपूर्ण श्रेय हे सर्व साधु संत, सामाजिक कार्यकर्त्यांना असल्याचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक आणि माजी प्रवक्ते मा. गो. वैद्य यांनी म्हटलं आहे. हेही वाचा.. भाजप आमदार राम कदम पुन्हा एकदा झाले ट्रोल, पाहा आता काय केला प्रताप! अयोध्येतील राम मंदिर उभारणी करीता सर्व कायदेशीर अडथळे दूर झाल्यानंतर आता सुप्रीम कोर्टात सुरु असलेला बाबरी मशिदीचा खटलाही निरर्थक ठरणार असल्याची टिप्पणी देखील मा. गो. वैद्य यांनी केली आहे. त्याचबरोबर भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती हे सर्वजण आरोपातून मुक्त होतील, असा आशावाद राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक आणि माजी प्रवक्ते मा. गो. वैद्य यांनी व्यक्त केला आहे.  ऐतिहासिक क्षणाचा मी साक्षीदार झालो हे माझं भाग्य रामनगरी अयोध्येत बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते राममंदिर भूमिपूजन सोहळा (Ayodhya Ram Mandir Bhumi Pujan) पार पडला. भूमिपूजन सोहळ्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंदिराचे मुख्य पुजारी श्री गद्दीनशीन प्रेमदास महाराज यांच्यासोबत हनुमानाचं दर्शन घेतलं तसेच, यांनी मोदींना चांदीचा ‘मुकुट’ परिधान केला. मोदींसह यावेळी पूजेला सरसंघचालक मोहन भागवतही बसले होते. पूजा संपन्न झाल्यानंतर मोदींनी जनतेशी संवाद साधला. श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने मला या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार व्हायला मिळालं. सर्वांचे आभार, या का ऐतिहासिक क्षणाचा मी साक्षीदार झालो हे माझं भाग्य आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. दुसरीकडे, AIMIM चे प्रमुख असदुद्दीन ओवेसी हे राममंदिर भूमिपूजनावरून नाराजी व्यक्त केली आहे. आज हिंदुत्व यशस्वी तर धर्मनिरपेक्षतेचा पराभव झाला आहे, अशा शब्दांत ओवेसींनी आगपाखड केली आहे.  एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना ते म्हणाले की, राममंदिर भूमिपूजनाच्या कार्यक्रमात सहभागी होऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जी प्रतिज्ञा घेतली होती. त्याचे उल्लंघन केलं आहे. त्यांनी राज्यघटनेची मूलभूत संरचना धर्मनिरपक्षेतेचं उल्लंघन केलं आहे. आजचा दिवस हिंदुत्वाच्या यशाचा तर धर्मनिरपक्षेतेच्या पराभवाचा दिवस आहे, अशा शब्दात ओवेसी यांनी नाराजी व्यक्त केली. हेही वाचा… शिवाजी महाराज आणि जिजाऊंबद्दल पोलिसानंच काढले अपशब्द, ऑडिओ क्लिप व्हायरल दरम्यान, खासदार असदउद्दीन ओवेसी यांनी राम मंदिर भूमिपूजनानिमित्ताने बुधवारी सकाळी एक ट्वीट केलं होतं. या ट्वीटमध्ये त्यांनी ‘बाबरी मशीद ही तेव्हाही होती, आजही आणि पुढेही राहील’ असं मत व्यक्त केले आहे. ओवेसी यांनी या ट्वीटसोबत जुन्या बाबरी मशिदीचा आणि बाबरी मशीद पाडण्याचा फोटोही ट्वीट केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या