JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / वाढदिवस ठरला मृत्यू दिवस; केक आणण्यासाठी गेलेल्या तरुणासोबत औरंगाबादमध्ये भयंकर घटना

वाढदिवस ठरला मृत्यू दिवस; केक आणण्यासाठी गेलेल्या तरुणासोबत औरंगाबादमध्ये भयंकर घटना

ऐन वाढदिवसाच्या दिवशीच तरुणाचा मृत्यू झाल्यानं गावावर शोककळा पसरली आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

औरंगाबाद, 25  जानेवारी, अविनाश कानडजे :  जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. ऐन वाढदिवसाच्या दिवशीच तरुणाचा मृत्यू झाला आहे. या घटनेनं तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. फुलंब्री तालुक्यातील जातेगावमधील ही घटना आहे. विकास शेजवळ असं मृत तरुणाचं नाव आहे. विकास याचा वाढदिवस होता. वाढदिवसाला केक आणण्यासाठी तो आपले भाऊजी सुरेश भालेराव यांच्यासोबत फुलंब्रीला गेला होता. मात्र घरी परतत असताना त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले मात्र यातील विकास शेजवळ याला डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. ऐन वाढदिवसांच्या दिवशीच तरुणाचा मृत्यू झाल्यानं गावावर शोककळा पसरली आहे. केक आणताना अपघात     घटनेबाबत अधिक माहिती अशी की, विकास शेजवळ हा  फुलंब्री तालुक्यातील जातेगावमधील रहिवासी आहे. त्याचा वाढदिवस असल्यानं तो त्याचे भाऊजी सुरेश भालेराव यांच्यासोबत केक आणण्यासाठी फुलंब्रीला गेला होता. मात्र केक घेऊन घरी परतत असताना फुलंब्री , राजुर रोडवरील ज्ञानसागर विद्यालयासमोर त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला. समोरून येणाऱ्या हायवाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले. अपघाताची घटना लक्षात येताच स्थानिकांनी दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र यातील विकास शेजवळ याला तपासून डॉक्टरांनी मृत घोषित केले. वाढदिवसाच्या दिवशीच तरुणाचा मृत्यू झाल्यानं गावावर शोककळा पसरली आहे. हेही वाचा :  घराचं दर उघडताच भाऊ हादरला; बेडरूममध्ये वहिनी अन् दोन पुतण्याचे मृतदेह तर हॉलमध्ये भावाचा मृत्यू भाऊजीवर रुग्णालयात उपचार या घटनेत मृत तरुणाचे भाऊजी सुरेश भालेराव हे देखील गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी औरंगाबामधील एका रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. ऐन वाढदिवसाच्या दिवशीच हा अपघात घडला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या