हा फोटो कुणी सोशल मीडियावर टाकला तो खरा आहे की खोटा याबाबत सायबर पोलीस तपासणी करीत आहे.
औरंगाबाद, 14 डिसेंबर : महाराष्ट्राची भाग्य रेषा म्हणून समृद्धी महामार्गाचे उद्घाटन करण्यात आले पण मागील काही दिवसांपासून कधी बैलगाड्या महामार्गावर धावत आहे, तर कुठे हरण पळत आहे. पण, आता तर महामार्गावर गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. याबद्दलचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. समृद्धी महामार्गावर एका तरुणाने हवेत गोळीबार केला असा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा फोटो खरा आहे की नाही याबद्दल अद्याप माहिती समोर येऊ शकली नाही. मात्र पाठीमाघे दिसणाऱ्या बोगद्यावरून हा फोटो औरंगाबाद जिल्ह्यातील सावंगी भागातील असल्याचे सांगितले जात आहे. हा तरुण हातात गन घेऊन महामार्गावर मध्येच उभा आहे. स्कॉपिर्ओ गाडीसमोर उभा राहून याने हवेत गोळीबार केला असं या फोटोतून दाखवण्यात आलं आहे.
हा फोटो कुणी सोशल मीडियावर टाकला तो खरा आहे की खोटा याबाबत सायबर पोलीस तपासणी करीत आहे. मात्र या फोटोवरून चर्चा मात्र सुरू झाली आहे. (Nagpur : बैलगाडीनंतर समृद्धी महामार्गावर धावले हरीण, Video Viral) दरम्यान, काही दिवसांपूर्वीच समृद्धी महामार्गावर चालणाऱ्या बैल गाड्यांच्या ताफ्याने सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधले. हे चित्र ताजे असतानाच, याच महामार्गावर दोन हरणाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे पुन्हा सोशल मीडियावर हा समृद्धी महामार्ग चर्चेचा विषय ठरला आहे. या व्हिडिओ मध्ये चक्क 2 हरीण पळताना दिसत आहेत. एका प्रवाशाने आपल्या मोबाईलमध्ये हा व्हिडिओ कैद केला आहे. प्राण्यांना रस्ता ओलांडण्यासाठी व्यवस्था तब्बल 10 जिल्हे 26 तालुके आणि 392 गावांना जोडणाऱ्या या महामार्गावर एकूण 50 उड्डाणपूल व 6 बोगदे आहेत. 300 वाहनांसाठींचे अंडरपास तर 400 पादचारी अंडरपास तयार करण्यात आले आहे. 55 हजार कोटी रुपयांचा खर्च करून तयार करण्यात आलेला हा महामार्ग एक आदर्श महामार्ग असल्याचा बोललं जात आहे. (सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारं ‘हाई झुमका वाली पोर’ गाणं कसं सुचलं? पाहा Video) विशेषतः यात वन्य प्राण्यांना रस्ता ओलांडण्यासाठी ठिकठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. पण, तरीही हा व्हिडीओ समोर आल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थितीत केले जात आहे.