JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 'शिवाजी तर जुने झाले आहे', राज्यपाल कोश्यारींचं पुन्हा बोलले

'शिवाजी तर जुने झाले आहे', राज्यपाल कोश्यारींचं पुन्हा बोलले

महाराष्ट्रात तुम्हाला नवे हिरो मिळतील, शिवाजी तर जुने झाले आहे. नवीन काळात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांपासून ते डॉ. नितीन गडकरींपर्यंत हिरो इथंच मिळतील'

जाहिरात

महाराष्ट्रात तुम्हाला नवे हिरो मिळतील, शिवाजी तर जुने झाले आहे. नवीन काळात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांपासून ते डॉ. नितीन गडकरींपर्यंत हिरो इथंच मिळतील'

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

औरंगाबाद, 19 नोव्हेंबर : राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे या ना त्या विधानामुळे कायम चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल नवं विधान केलं आहे. ‘आता महाराष्ट्रात तुम्हाला नवे हिरो मिळतील, शिवाजी तर जुने झाले आहे. नवीन काळात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांपासून ते डॉ.गडकरींपर्यंत हिरो इथंच मिळतील’ असं विधान राज्यपालांनी केलं आहे. त्यांच्या विधानामुळे वाद पेटण्याची चिन्ह आहे. औरंगाबादमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठामध्ये दीक्षांत समारंभ सोहळा पार पडला. यावेळी राज्यपाल कोश्यारी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थितीत होते. यावेळी बोलताना राज्यपालांनी नवी विधान केलं. ‘आम्ही जेव्हा शिकत होतो, ते आम्हाला विचारत होते, तुमचा आवडता हिरो कोण आहे. आम्ही त्यावेळी सुभाषचंद्र बोस, नेहरू, गांधी जे चांगले वाटत असेल त्यांची नाव सांगत होतो. पण, आता महाराष्ट्रात तुम्हाला नवे हिरो मिळतील, शिवाजी तर जुने झाले आहे. नवीन काळात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांपासून ते डॉ. नितीन गडकरींपर्यंत हिरो इथंच मिळतील’ असं म्हणत राज्यपालांनी महापुरुषांची तुलना गडकरी आणि पवारांसोबत केली. (राज्यपाल सावित्रीबाई फुलेंबद्दल बोलले तेव्हा कुठे होता? रोहित पवारांचा भाजपला खोचक सवाल) ‘तुम्ही नवे विद्यार्थी आहात. लवकरच नव्या आयुष्यात प्रवेश करणार आहात. नवीन काही लक्ष्य समोर ठेवणार असाल तर पवार साहेब आणि गडकरी हे व्हिजनरी आहे. दोन्ही नेते संकल्प शक्ती आहे, व्हिजनरी आहे, सोबत गडकरी हे तर मिशनरी आहे, ते एकदा मागे लागेल तर काम केल्याशिवाय मागे हटत नाही’ असंही राज्यपाल म्हणाले. ‘आम्ही जेव्हा विश्वगुरू बनू सांगत होतो तर वेड्यात काढत होते मात्र आता प्रगतीपाहुन धक्क झाले. घरा घरात शौचालय बनवणे मोठे अवघड होते पण मोदींनी ते करून दाखवले. पाहिले बँकेत खाते उघडत नव्हते मात्र आता प्रत्येक्कांचे बँक खाते आहे. आपला पंतप्रधान महत्वकांक्षी आहे’, असं म्हणत राज्यपालांनी पंतप्रधान मोदींचं कौतुक केलं. (Aditya Thackeray Yuva Sena : ठाकरे गटाची गळती काही थांबेना, आता युवासेनेत मोठं खिंडार) ‘मी मराठी बोलत नाही कारण मी हिंदी बोललो की टाळ्या वाजतात. सर्व भाषा यायला हव्या मी सर्व भाषा समजू शकतो. मला इंग्रजीचे मुले भेटले मी त्यांना विचारले स्वप्न इंग्रजीचे येतात ला तर ते म्हणतात हिंदीत येतात. सर्व म्हणतात मला इंग्रजी पाहिजे तर मग स्वप्न का मातृभाषेत पडतात? मी जेव्हा विचारतो बाजी प्रभू वाचले का , ज्ञानेश्वर वाचले का तर खूप कमी हो म्हणता. आपण सर्वांनी महापुरुष आणि संतांची पुस्तके वाचले पाहिजे तेव्हा वाईट घडणार नाही. आपल्या मैत्रिणीचे 35 तुकडे करणार नाही, असंही राज्यपाल श्रद्धा वालकर हत्याकांडावर भाष्य केलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या