JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / ठरलं! या दिवशी होणार मंत्रिमंडळाचा विस्तार; शिंदे गटाच्या आमदाराने सांगितली तारीख

ठरलं! या दिवशी होणार मंत्रिमंडळाचा विस्तार; शिंदे गटाच्या आमदाराने सांगितली तारीख

गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला आहे. मंत्रिमंडळाच्या विस्ताराला विलंब होत असल्यानं विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवण्यात येत आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 7  जानेवारी :  गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला आहे. मंत्रिमंडळाच्या विस्ताराला विलंब होत असल्यानं विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवण्यात येत आहे. तसेच मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? याकडं सत्ताधारी आमदारांसोबतच विरोधकांच्या देखील नजरा लागल्या आहेत. दरम्यान आज शिंदे गटाचे आमदार संजय सिरसाट यांनी मंत्रिमंडळ विस्तारावर प्रतिक्रिया दिली आहे. येत्या 20 ते 22 जानेवारीपर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असा अंदाज असल्याचं सिरसाट यांनी म्हटलं आहे. नेमकं काय म्हणाले संजय सिरसाट  मंत्रिमंडळ विस्तारामध्ये काही तांत्रिक अडचणी आहेत, त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडला. मात्र आता येत्या  20 ते 22  जानेवारीपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो असा अंदाज असल्याचं सिरसाट यांनी म्हटलं आहे. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत कोणावरही दबाव नाही, माझ्याबाबत पक्ष जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे. दरम्यान यावेळी त्यांनी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना देखील टोला लगावला आहे. संजय राऊत यांच्यावर टीका   दरम्यान यावेळी संजय सिरसाट यांनी ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांना देखील जोरदार टोला लगावला आहे.  संजय राऊत हेच शिवसेना संपवण्याचे कटकारस्थान करत आहेत असा आरोप त्यांनी केला आहे. एवढचं नव्हे तर उद्धव ठाकरे यांच्यावर देखील संजय राऊत यांचा दबाव असल्याचं सिरसाट यांनी म्हटलं आहे. दरम्यान काल रात्री योगेश कदम यांचा अपघात झाला. गरज भासल्यास या अपघाताची चौकशी करावी अशी मागणीही यावेळी सिरसाट यांनी केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या