दसरा मेळाव्यावरून शिवसेना आणि शिंदे गटामध्ये जोरदार चढाओढ सुरू आहे. कोण जास्त गर्दी जमवतो, यावरून दोन्ही गटामध्ये रस्सीखेच सुरू आहे
औरंगाबाद, 05 ऑक्टोबर : दसरा मेळाव्यावरून शिवसेना आणि शिंदे गटामध्ये जोरदार चढाओढ सुरू आहे. कोण जास्त गर्दी जमवतो, यावरून दोन्ही गटामध्ये रस्सीखेच सुरू आहे. पण, अशातच औरंगाबाद ते मुंबई विमानात वेगळेच चित्र पाहण्यास मिळाले. शिवसेनेचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि शिंदे गटाचे मंत्री संदीपान भुमरे हे एकाच विमानाने मुंबईला आले. आज मुंबईमध्ये शिवसेना आणि शिंदे गटाचा दसरा मेळावा आहे. दोन्ही गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने मुंबईला पोहचले आहे. आज सकाळी अंबादास दानवे आणि संदीपान भुमरे एकाच विमानाने मुंबईकडे रवाना झाले. विमानात दोघांच्या सीट आजूबाजूला होत्या. त्यामुळे दोघेही हास्य विनोद करीत असतानाची क्लिप व्हायरल झाली आहे.
‘सामना कुणाला वाचायची गरज आहे? यावरून दोन्ही नेत्यांमध्ये संवाद रंगला होता. सामना तुम्हाला आणि आम्हाला वाचण्याची आवश्यकता आहे असा विनोद संदीपान भुमरे यांनी केला. त्यावर अंबादास दानवेही दिलखुलास हसताना दिसत आहे. (Dasara Melava : शिवसेनेमध्ये जे आजपर्यंत कधी घडलं नाही, ते आज घडणार!) रेल्वेत 50 खोके एकदम ओकेच्या घोषणा दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील शिवसैनिक रेल्वेने मध्यरात्री मोठ्या संख्येने शिवतीर्थ येथे होणाऱ्या दसरा मेळाव्यात सहभागी होण्यासाठी मार्गस्थ झाले. जळगाव स्टेशनला मोठ्या प्रमाणात शिवसैनिक हे मुंबईतील शिवतीर्थ मैदानावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी निघाले आहेत. (Dasara Melava : मुख्यमंत्र्यांची ‘मोदी स्टाईल’, दसरा मेळाव्यात पुन्हा ठाकरेंवर ‘सर्जिकल स्ट्राईक’ करणार!) रेल्वेने मुंबईकडे निघालेल्या शिवसैनिकांनी गाडीमध्येच मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करत ‘उद्धवसाहेब तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, अशा घोषणाबाजी करण्यात आली. तर ठेचा भाकरची शिदोरीसोबत घेऊन आम्ही उद्धव साहेबांचे विचार ऐकण्यासाठी निघालो आहोत’ अशी प्रतिक्रिया यावेळी एकनिष्ठ शिवसैनिकांनी दिली.