JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / रात्री शांत झोप लागत नाही? 'या' टिप्स करा फॉलो, तुम्हाला जाणवेल फरक! Video

रात्री शांत झोप लागत नाही? 'या' टिप्स करा फॉलो, तुम्हाला जाणवेल फरक! Video

Sleeping difficulties : रात्रीच्या वेळी वेळेवर झोप न लागणे, अचानक जाग येणे हे प्रमाण हल्ली मोठ्या प्रमाणात वाढलंय.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

सुशील राऊत, प्रतिनिधी औरंगाबाद, 5 फेब्रुवारी : निरोगी आयुष्यासाठी आपल्याला दिवसभरामध्ये आठ तास झोप आवश्यक असते. मात्र बदलत्या जीवनशैलीत वाढलेल्या ताणामुळे या झोपेचं प्रमाण कमी झालं आहे. गेल्या काही वर्षांमध्ये झपाट्यानं विकसित झालेलं औरंगाबादसारखं महानगर देखील त्याला अपवाद नाही. औरंगाबादकरांमध्येही रात्रीच्या वेळी झोप न लागण्याचं प्रमाण वाढलंय. मानसोपचार तज्ज्ञांकडं याबाबत येणाऱ्या तक्रारीमध्ये वाढ झालीय. मानसोपचार तज्ज्ञ संदीप शिसोदे यांनी यावर काही उपाय सांगितले आहेत. तुम्हालाही या प्रकारची अडचण येत असेल तर त्यावर मात करण्यासाठी या टिप्स उपयोगाला येतील. झोप का लागत नाही? आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येकाकडं अत्याधुनिक साहित्य आले आहे. या साहित्याचा रोजचं आयुष्य सोपं आणि वेगवान होण्यात फायदा झालाय. त्याचबरोबर याचे काही तोटेही आहेत. आता अनेकांच्या हातामध्ये स्मार्टफोन आहे. या स्मार्टफोनचं त्यांना व्यसन लागलंय. मोबाईलशिवाय बसणं, झोपणंच काय काहीही शक्य नाही अशी अनेकांची भावना असते. रात्री झोप न लागण्याच्या समस्येतही हे महत्त्वाचं कारण आहे. मानसोपचार रुग्णालयामध्ये येणाऱ्या दहापैकी पाच रुग्णांना झोप न लागण्याची समस्या आहे. तर काही जणांना झोप लागल्यावर अचानक काही वेळानं जाग येते. 40 ते 50 वयोगटातील नागरिकांचा यामध्ये समावेश आहे. झोपेच्या गोळ्या घेतल्याशिवाय झोप येत नाही अशाही तक्रारी आहेत. यामध्ये महिलांपेक्षा पुरुषांचं प्रमाण जास्त आहे. डोकेदुखी, हाय ब्लड प्रेशरपासून मिळेल आराम आणि लागेल शांत झोप, ट्राय करा… काय उपाय करणार? - सकाळी लवकर उठून व्यायाम करणे आवश्यक आहे - सकाळी योगासनं देखील करावी - वेळेवर जेवण करावे - स्वत:बद्दल आणि इतरांबद्दल सकारात्मक विचार करावा - मोबाईल आणि इतर स्क्रिन पासून दूर रहावे - सर्व गोष्टी माझ्या मनासारख्या झाल्या पाहिजेत. मला वेळेच्या आधी सर्व काही मिळावं. इतरांनी माझं ऐकलं पाहिजे, ते माझ्या नियंत्रणात राहिले पाहिजेत हा अट्टहास थांबवणे अत्यंत महत्त्वाचं आहे.

माणूस दिवसभरात बुद्धीचं आणि शारीरिक काम करत असतो. त्यानंतर आपली झोप झाली तर आपण फ्रेश राहतो. सर्व कामं उत्साहानं आणि चांगल्या पद्धतीनं करु शकतो. त्यामुळे झोपेची काळजी घेणं आवश्यक आहे, असे मानसोपचार तज्ज्ञ डॉ. शिसोदे यांनी स्पष्ट केले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या