JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Children's Day : विद्यार्थ्यांनी केली पर्यावरणाबाबत जागृती, बाल दिनानिमित्त रंगली स्पर्धा, video

Children's Day : विद्यार्थ्यांनी केली पर्यावरणाबाबत जागृती, बाल दिनानिमित्त रंगली स्पर्धा, video

बालदिनानिमित्त औरंगाबाद महानगरपालिका आणि इको ग्रीन फाउंडेशनच्या वतीने भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होतं.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

औरंगाबाद, 14 नोव्हेंबर :  बालदिनानिमित्त औरंगाबाद महानगरपालिका आणि इको ग्रीन फाउंडेशनच्या वतीने भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेसाठी शहरातील 70 शाळांतील 3 हजाराहून अधिक विद्यार्थी या चित्रकला स्पर्धेसाठी सहभागी झाले होते. या भव्य चित्रकला स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे चित्र प्रदर्शन सिद्धार्थ उद्यानाच्या मैदानावरती भरवण्यात आलं. बालदिनानिमित्त देशभरामध्ये विविध उपक्रम राबवले जात आहेत. मात्र, बालकांमध्ये पर्यावरणाची गोडी निर्माण व्हावी यासाठी बालदिनानिमित्त पर्यावरण जनजागृती साठी विविध उपक्रम राबवणाऱ्या इको ग्रीन फाउंडेशन या संस्थेच्या वतीने व महापालिकेच्या सहकार्याने शालेय विद्यार्थ्यांसाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेसाठी चित्रकलेचा विषय हा पर्यावरणाशी संबंधित देण्यात आला होता. जेणेकरून विद्यार्थ्यांना पर्यावरणाची आवड निर्माण व्हावी. या चित्रकला स्पर्धेत विद्यार्थ्यांनी पर्यावरण जनजागृती विषयक चित्र काढले, असं इको ग्रीन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. मीनाक्षी बत्तीसे यांनी सांगितलं.

Children’s Day : मुलांनी दाखवलं बहुरुंगी मुंबईचं नवं रूप, पाहा Video

अशी घेण्यात आली स्पर्धा कोरोना संसर्गजन्य परिस्थितीत शाळा महाविद्यालये बंद होती. यामुळे लहान मुले घरात होती. तब्बल दोन वर्ष शाळा बंद होती. आता शाळा सुरू झाली. यामुळे मुलांना निसर्गरम्य वातावरणात वावरता यावं यासाठी महानगरपालिकेच्या सिद्धार्थ उद्यानात ही स्पर्धा भरवण्यात आली. यामध्ये पहिली ते चौथी पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी अशा तीन गटात ही स्पर्धा घेण्यात आली. विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा निःशुल्क होती. या स्पर्धेचे वैशिष्ट्य होतं रंगांमध्ये बंधन ठेवण्यात आलेले नव्हतं तर स्पर्धेसाठी लागणारा कागद संस्थेतर्फे उपलब्ध करून देण्यात आला होता. बालदिनानिमित्त चिमुकल्यांसाठी महानगरपालिका व एको ग्रीन फाउंडेशन तर्फे भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होतं. या चित्रकला स्पर्धेमध्ये शहरातील विविध शाळेतील विद्यार्थी सहभागी झाले होते. चित्रकला स्पर्धा आयोजित करून विद्यार्थ्यांना बाल दिनाच्या शुभेच्छा देणं ही एक नवीन संकल्पना आहे. यासाठी या फाउंडेशनच्या वतीने घेण्यात आलेला पुढाकाराने आणि महापालिकेच्या शिक्षण विभागाने केलेल्या प्रयत्नामुळे यश आले आहे, असं मनपा प्रशासक डॉ.अभिजित चौधरी यांनी सांगितलं.

Children’s Day : मुलीसाठी धडपडणाऱ्या बाबाची ‘गोष्ट’, लेकीला करून दिली नव्या जगाची ओळख! Video

संबंधित बातम्या

दोन वर्षानंतर शाळा सुरू झाली आहे आणि त्यानंतर ही भव्य मोठी स्पर्धा आयोजित करण्यात आली. मोकळ्या वातावरणात चित्र रंगवताना आनंद झाला. या चित्रकला स्पर्धेसाठी पर्यावरणाशी संबंधित विषय देण्यात आल्यामुळे आम्ही त्या संबंधी चित्र रंगवले, असं विद्यार्थिनी संध्या हजारे हिने सांगितले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या