JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / औरंगाबादची फेमस युट्युबर बिंदास काव्या बेपत्ता, 24 तास उलटले तरी शोध लागेना!

औरंगाबादची फेमस युट्युबर बिंदास काव्या बेपत्ता, 24 तास उलटले तरी शोध लागेना!

औरंगाबाद शहरात राहणारी प्रसिद्ध युट्यूबर बिंदास काव्या शुक्रवारपासून अचानक बेपत्ता झाली आहे.

जाहिरात

औरंगाबाद शहरात राहणारी प्रसिद्ध युट्यूबर बिंदास काव्या शुक्रवारपासून अचानक बेपत्ता झाली आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अविनाश कानडजे, प्रतिनिधी औरंगाबाद, 10 सप्टेंबर : राज्यात गेल्या काही दिवसांपासून तरुण-तरुणी बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले आहे. अशातच औरंगाबादमधील फेमस युट्युबर गर्ल बिंदास काव्या शुक्रवारपासून बेपत्ता झाली आहे. बिंदास काव्या (YouTuber Bindas Kavya) अचानक बेपत्ता झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. औरंगाबाद येथील एक प्रसिद्ध अल्पवयीन यूट्युबर काल दुपारपासून दिवसांपासून बेपत्ता असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी मुलीच्या आईने पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून छावणी पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल करण्यात आली आहे. तर पोलिसांकडून मुलीचा शोध घेतला आहे. विशेष म्हणजे ही अल्पवयीन मुलगी यूट्युबर प्रसिद्ध असून, तिचे यूट्युबवर 4.32 मिलियन सबक्राबर आहेत. (अपहरण केलं अन् बेशुद्ध करण्यासाठी केला अतिप्रमाणात क्लोरोफॉर्मचा वापर, 8 वर्षांच्या मुलाचा जागीच मृत्यू) औरंगाबाद मधील बिंदास काव्या ही युट्युब सेलिब्रिटी कालपासून गायब आहे. याप्रकरणी तिच्या आई-वडिलांनी छावणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. बिंदास काव्या ही अल्पवयीन असल्याने पोलिसांनी 363 नुसार गुन्हा दाखल केला असून पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार काव्य ही रेल्वेने बाहेरगावी गेली असल्याचा संशय पोलिसांना आहे. शुक्रवरी अभ्यासाच्या कारणावरून तिचे आणि आई वडिलांचे भांडण झाले आई-वडिलांनी तिचा मोबाईल घेतल्याने ती रागाच्या भरात घरातून निघून गेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी छावणी पोलीस अधिक तपास करत आहेत. कमी वयात काव्याने youtube वर यशस्वी भरारी घेतली आहे. याबाबत या मुलीच्या आईने एक 19 मिनिटाचा व्हिडीओ प्रसिद्ध केला असून, ज्यात आमची मुलगी कधीही एकटी राहत नाही. एवढ्या वेळ ती एकटी राहू शकत नाही. त्यामुळे तिला कुठेही पाहिले तर आम्हाला माहिती कळवा असे आवाहन केले आहे. सोबतचा आम्हाला कुणीही मदत करत नसल्याचा आरोपही मुलीच्या आईने केला आहे. (सासऱ्याला बस स्थानकावर सोडण्यासाठी जात असतान ट्रकने सूनेला चिरडले, औरंगाबादेतील घटना) काव्या मिसिंग असल्याची तक्रार आमच्याकडे आहे आणि त्या नुसार आम्ही पूर्ण तपास करतोय, सायबर पोलिसांच्या मदतीने हा तपास सुरू आहे. माहितीनुसार काव्य तिच्या एका मित्रासोबत असल्याची माहिती आली आहे. लवकरच तिचा शोध घेण्यात आम्ही यशस्वी होऊ, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या