JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / मनसे पदाधिकाऱ्याला अज्ञातांनी नेले फरफटत, पाहा हा LIVE VIDEO

मनसे पदाधिकाऱ्याला अज्ञातांनी नेले फरफटत, पाहा हा LIVE VIDEO

भर रस्त्यात घडलेल्या या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

उल्हासनगर, 2 फेब्रुवारी : उल्हासनगर शहरातील मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप गोडसे यांना अज्ञात दुचाकीस्वारांनी फरफटत नेल्याचा प्रकार सीसीटीव्हीतून समोर आला आहे. कॅम्प चारच्या लालचक्की भागातील सोमवारी रात्री घडलेला प्रकार आहे. भर रस्त्यात घडलेल्या या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली. मनसे आमदार राजू पाटील यांच्याकडील बैठक संपवून गोडसे हे रात्री साडेदहाच्या सुमारास लालचक्की येथील आपल्या जनसंपर्क कार्यालयासमोर फोनवर बोलत उभे होते. याच वेळी दुचाकीवर आलेल्या अज्ञात दोघांनी गोडसे यांच्या गळ्याभोवती फास आवळत त्यांना फरफटत नेत रस्त्यावर फेकले. या हल्लेखोरांनी हातावर वार केल्याचे गोडसे यांनी सांगितलं आहे. यात त्यांच्या हाताला किरकोळ दुखापत झाली आहे.

अचानकपणे झालेल्या या हल्ल्यामुळे बेसावध असलेले गोडसे जमिनीवर पडले. सुरुवातीला विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात या प्रकरणी अदखल पात्र गुन्हा नोंदवण्यात आला होता. दरम्यान, मोबाईल स्नॅचिंग करण्याचा हा प्रयत्न असल्याचं पोलिसांचं म्हणणं असून, त्यानुसार तक्रार दाखल केल्याचं वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी सांगितलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या