JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / उद्धव ठाकरेंना कोकणातून आणखी एक धक्का, 41 वा आमदार शिंदेंकडे जाणार!

उद्धव ठाकरेंना कोकणातून आणखी एक धक्का, 41 वा आमदार शिंदेंकडे जाणार!

आधीच अडचणीत सापडलेल्या उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. शिवसेनेचा (Shivsena) 41 वा आमदार शिंदेंकडे जाणार असल्याचं बोललं जातंय. हा आमदार कोकणातला असल्याचंही वृत्त आहे.

जाहिरात

Uddhav Thackeray-Eknath Shinde

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 18 ऑगस्ट : एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेसमोर (Shivsena) इतिहासातलं सगळ्यात मोठं आव्हान उभं ठाकलं आहे. एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि महाविकासआघाडी (Mahavikas Aghadi) सरकार कोसळलं. शिंदेंसोबत शिवसेनेचे 55 पैकी 40 आमदार गेले, यानंतर आता 41 वा आमदार शिंदेंकडे जाणार असल्याचं वृत्त महाराष्ट्र टाईम्सने सूत्रांच्या हवाल्याने दिलं आहे. एकनाथ शिंदेंकडे जाणारा हा आमदार कोकणातील असल्याचंही या वृत्तात सांगण्यात आलं आहे. शिवसेनेकडे सध्या कोकणात 3 आमदार आहेत, यात राजन साळवी (Rajan Salvi), वैभव नाईक (Vaibhav Naik) आणि भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांचा समावेश आहे, यापैकीच एक आमदार पुढच्या 48 तासांमध्ये शिंदेंकडे असू शकतो. कोकणातील रिफायनरी प्रकल्पाला शिवसेनेचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी विरोध केला आहे, तर आमदार राजन साळवी हे रिफायनरी प्रकल्पासाठी अनुकूल आहेत. काहीच दिवसांपूर्वी उद्योगमंत्री उदय सामंत हे कोकणात होते, तेव्हा त्यांनीही रिफायनरीबाबत अनुकूल अशीच भूमिका घेतली. प्रकल्पामुळे कोकणात रोजगारनिर्मिती होईल आणि कोकणाचा विकास होईल, असं सामंत म्हणाले होते. सध्या महाराष्ट्राचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे, त्यामुळे जवळपास सगळेच आमदार मुंबईमध्ये आहेत. कोकणातल्या शिवसेनेच्या 3 पैकी एका आमदाराने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतल्याचंही सांगण्यात येत आहे. दरम्यान आजच उदय सामंत यांनी घोषणाबाजी करणारे विरोधातले आमदार लवकरच शिंदेंकडे येणार असल्याचं सूचक वक्तव्यही केलं होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या