मुंबई, 16 ऑक्टोबर : अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीमध्ये रोज नवे ट्विस्ट येत आहेत. या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून ऋतुजा लटके आणि भाजपकडून मुरजी पटेल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. रमेश लटके यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक होत आहे. ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, म्हणून राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके आमदार झाल्या तर हीच रमेश लटकेंच्या आत्म्याला शांती मिळेल, असं राज ठाकरे त्यांच्या पत्रात म्हणाले आहेत. राज ठाकरेंच्या या पत्रावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या पत्रावर विचार ही करायचा झाला तर मला तो एकटा करता येणार नाही. माझ्या पक्षात मी काही एकटा निर्णय घेत नाही. बाळासाहेबांची शिवसेना पण आमच्या सोबत आहे. त्यामुळे मला मुख्यंमत्र्यांना पण विचारावे लागेल. पक्षातील माझ्या सहकाऱ्यांशी चर्चा करावी लागेल. चर्चेअंतीच कुठलाही निर्णय घेतला जाईल’ असं फडणवीस म्हणाले. अंधेरी पोटनिवडणुकीतून भाजपची माघार? राज ठाकरेंच्या पत्रानंतर फडणवीसांचे संकेत पोटनिवडणूक निश्चित राज ठाकरे यांच्या आवाहनानंतर भाजपच्या मुरजी पटेल यांनी उमेदवारी मागे घेतली, तरीही अंधेरीची ही पोटनिवडणूक बिनविरोध होणार नाही. अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीसाठी 25 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यातल्या भाजपच्या मुरजी पटेल यांचे 2 अर्ज केले आहेत, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून ऋतुजा लटके यांचा आणि संदीप नाईक यांचा डमी अर्ज आला आहे. उमेदवारांची छाननी झाल्यानंतर आता 14 जणांचे उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. कोणाचे अर्ज वैध ऋतुजा लटके (शिवसेना बाळासाहेब ठाकरे), मुरजी पटेल (भाजप), राकेश अरोरा (हिंदुस्थान जनता पक्ष), बाला व्यंकटेश विनायक नाडार (आपकी अपनी पक्ष- पीपल्स), मनोज श्रावण नायक (राइट टू रिकॉल पक्ष), अपक्ष चंदन चतुर्वेदी , चंद्रकांत रंभाजी मोटे , निकोलस अल्मेडा , नीना खेडेकर, पहलसिंग धनसिंग आऊजी, फरहाना सिराज सय्यद, मिलिंद कांबळे, राजेश त्रिपाठी आणि शकिब जाफर ईमाम मलिक या 14 जणांचे अर्ज वैध ठरले आहेत. अंधेरी पोटनिवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतीम मुदत 17 ऑक्टोबरपर्यंत आहे. 17 तारखेपर्यंत भाजपच्या मुरजी पटेल यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला तर ऋतुजा लटके यांचा विजय सोपा होईल, पण आणखी 12 जण रिंगणात उतरल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार नाही. 3 नोव्हेंबरला अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक होणार आहे. राज ठाकरेंचं फडणवीसांना पत्र, अंधेरीची निवडणूक बिनविरोध? ऋतुजा लटके म्हणतात…