ऋतुजा लटके राजीनामा प्रकरण
मुंबई 13 ऑक्टोबर : अंधेरी पोटनिवडणुकीसाठी ठाकरेंनी आपला उमेदवारही घोषित केला. मात्र, त्यांच्या उमेदवाराचा राजीनामा BMC कडून स्वीकारला गेला नाही. ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर झाला नाही, तर त्यांची उमेदवारी अडचणीत सापडण्याची शक्यता होती. त्यामुळे ऋतुजा लटके यांनी उच्च न्यायालयात धाव घेत आपला राजीनामा स्वीकारला जावा, अशी मागणी केली. यावर आता मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वाचा निकाल दिला आहे. लटकेंचा राजीनामा आदेश मंजुर करण्यात आल्याची माहिती समोर आला आहे. हायकोर्टाने हा निर्णय दिला आहे. त्यामुळे लटकेंना ठाकरेंकडून निवडणूक लढवण्याचे सर्व मार्ग मोकळे झाले आहेत. शिंदे आणि ठाकरे गटासाठी ही अटीतटीची लढाई आहे. अंधेरी पोटनिवडणुकीत ठाकरेंच्या बाजूने ऋतुजा लटके यांना निवडणूक लढवायची असल्याने त्यांनी बीएमसीत राजीनामा टाकला होता. अखेर बऱ्याच युक्तीवादानंतर उच्च न्यायालयाने तो मंजूर केला आहे. Andheri East Bypoll : ऋतुजा लटके राजीनामा प्रकरण: कोर्टात आतापर्यंत काय घडलं? वाचा सविस्तर उद्या 11 वाजेपर्यंत लटकेंचा राजीनामा मंजूर करा, असे आदेश उच्च न्यायालयाने बीएमसीला दिला आहे. कसा होता घटनाक्रम? BMC च्या वकिलांनी सुनावणीदरम्यान सांगितलं की, ऋतुजा लटके नियमित नोकरीवर येत नव्हत्या. याशिवाय राजीनाम्यानंतर 30 दिवसांची नोटीस पूर्ण करणे आवश्यक असल्याचं सांगण्यात आलं. कोर्ट म्हणालं… कोर्टाने दोन्ही बाजूनं सुनावलं असून पैसे भऱले म्हणून वेळ कमी करता येत नाही, असंही कोर्टाने यावेळी सांगितलं. पहिल्या सत्रात सुनावणीत काय झालं ? - ऋतुजा लटके यांच्या वकिलांनी आधीच्या सुनावणीत हेमांगी वरळीकर यांच्या केसचा दाखला दिला होता. - तर 1 महिना नोटीस कालावधी हा कर्मचारी हितासाठी नियम असल्याचा युक्तीवाद करण्यात आला होता. - ऋतुजा यांचा राजीनामा हा राजकिय दबावाखाली मंजूर करीत नसल्याचा आरोप करण्यात आला होता. - आता BMCचे वकिल अनिल साखरे यांनी प्रशासनाची भूमिका स्पष्ट केली.