दुसऱ्या पत्नीने याबाबत पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर तरुणाला अटक करण्यात आली. पोलिसांनी तरुणावर बलात्कार आणि अब्रुनुकसानीचा गुन्हा दाखल केला आहे. दुसऱ्या पत्नीचा आरोप आहे की, तिचे इन्टिमेट क्षण ऑनलाइन दाखवित तरुणाने तिला टॉर्चर केलं. आरोपीच केवळ 10 वीपर्यंत शिक्षण झालं आहे. मात्र त्याला कम्प्युटरचं चांगल ज्ञान आहे.
अमरावती, 6 फेब्रुवारी : अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील 12 वर्षीय आदिवासी मुलीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली आहे. तिवसा पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या परिसरात एका 34 वर्षीय नराधमाने हे कृत्य केलं आहे. पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तसंच तासाभरातच आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. मात्र या घटनेनंतर पुन्हा एकदा मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे, तर आरोपी हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे. हेही वाचा - धक्कादायक! NAVY अधिकाऱ्याचं अपहरण करून जिवंत जाळले, मुंबईत उपचारादरम्यान मृत्यू सदर मुलगी व आरोपी एका गावातील असून तिला गावाजवळील एका ठिकाणी नेऊन तिच्यावर आरोपीने बलात्कार केला. विठ्ठल कामठे असं आरोपीचं नाव आहे. सदर घटनेची तक्रार मुलीच्या आईने तिवसा पोलीस ठाण्यात दिलेली आहे, तर पीडित मुलगी ही 7 वीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. हेही वाचा- तंत्र-मंत्रांच्या आहारी गेलेल्या सूनेचं घृणास्पद कृत्य, साधनेसाठी अपंग सासर्याची गळा चिरून हत्या तिवसा पोलिसांत आरोपीविरुद्ध बलात्काराच्या कलम376,(3),सह कलम 4,6,पोस्कोसह अनुसूचित जाती जमाती अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर अमरावती जिल्ह्यातील संतापाची लाट पसरली असून आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी आता पुढे येत आहे.