JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / राज्याच्या राजकारणातील मोठी बातमी! शिवसेना सावरण्याचा प्रयत्न, उद्धव ठाकरेंनी केली या पक्षासोबत युती

राज्याच्या राजकारणातील मोठी बातमी! शिवसेना सावरण्याचा प्रयत्न, उद्धव ठाकरेंनी केली या पक्षासोबत युती

संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेनं हातमिळवणी केली असून इथून पुढे हे दोन्ही पक्ष एकत्र काम करणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 26 ऑगस्ट : शिंदे गटाने केलेल्या बंडानंतर शिवसेनेत उभी फूट पडलेली असतानाच आता राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेनं हातमिळवणी केली असून इथून पुढे हे दोन्ही पक्ष एकत्र काम करणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.  संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी आज या युतीची घोषणा केली. सोनिया- राहुल यांचं ‘मिशन काश्मीर’ फेल, गुलाम नबी आझाद यांचा राजीनामा यासाठी केली युती - संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की गेल्या अडीच वर्षांच्या काळात उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना चांगलं लोकहित पाहिलं. चांगले निर्णय घेतले. आता लोकशाही धोक्यात आलेली असताना छोटे पक्ष, संघटना वाचवायच्या असतील तर एकत्र यावं लागेल, यावर आमचं एकमत झालं. विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक निवडणुकांसाठी एकत्र लढण्याची तयारी केली जाणार आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, या लढवय्या सहकाऱ्यांचं मी स्वागत करतो. केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशात प्रादेशिक पक्ष संपवण्याचं कारस्थान सुरु आहे.  आपल्या विचारांचे लोकं आज सोबत येत आहेत. प्रादेशिक अस्मिता वाचवण्यासाठी एकत्र यायला हवं असं मला अनेकजण म्हणतात. संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना एकत्र येऊन आपण मोठा इतिहास घडवू.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या