मुलगा, मुलगी भेद करणाऱ्यांना चपराक, मुलगा नसलेल्या वडिलांना मुलींनीच खांदा देत केले अंत्यसंस्कार
अकोला, 22 फेब्रुवारी : मुलगी हे परक्याचे धन समजले जात असल्याने दुय्यम वागणूक दिली जाते. मात्र अकोल्यातील (Akola) लिलाधरसा गोडले यांच्या निधनानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी त्यांच्या दोन्ही मुली पुढे सरसावल्या. त्यांनी मृतदेहाच्या तिरडीला खांदा देत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार (last ritual) केले आहेत. मुलींनी आपल्या आजारी आईचाही सांभाळ करण्याची शपथ अंत्यसंस्कारप्रसंगी (Funeral) घेतली. त्यावेळी अनेकांचे डोळे पाणावले होते. आजही जन्मदात्या वडिलांच्या पार्थिवाला मुलानेच खांदा देण्याची भारतात प्रथा आहे. मात्र या प्रथेला छेद देणारी घटना अकोल्यातील जुने शहरात घडली. अकोला शहरातील जुने शहर हा एक भाग याच भागात राहणारे लिलाधरसा वामनसा गोडले आणि सौ. गोडले याचा सर्वसाधारण परिवार. काबाडकष्ट करणाऱ्या लिलाधरसा यांनी मधुरा आणि धनश्री या दोन्ही मुलींना मोठं करून शिक्षण व संगोपण केले. वय वाढत गेले तसे कष्ट झेपत नसल्याने साठी पार केलेल्या आपल्या वडील व आजारी आईचा सांभाळ या दोन्ही मुली करीत होत्या. वाचा : जादूटोण्याच्या संशयावरुन कुटुंबाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न,यवतमाळ हादरलं आई आजारी आणि वडिलांचे वय झालेले असल्याने घराची संपूर्ण जबाबदारी आता या दोन्ही मुलींच्याच खांद्यावर होती. गुण्यागोविंदाने राहणाऱ्या या परिवारावर काळाने घाला घातला आणि वयाच्या 61 व्या वर्षी मधुरा आणि धनश्री यांचे वडील लिलाधरसा यांचे अचानक निधन झाले. परिस्थिती हलाकीची आई देखील आजारी राहत असून सुद्धा वडिलांनी कधीच कोणत्या गोष्टीची कमतरता पडू न देता दोन्ही मुलींचा सांभाळ केला. त्यांच्या निधनानंतर अखेर मुलींनी तिरडीला खांदा देण्याचा निर्णय घेतला. तसेच त्यांनीच अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. मुलगा नसणाऱ्या वडिलांचे मुलींनी खांदा देत अंत्यसंस्कार केले आहेत. या घटनेनं मुलगा, मुलगी असा भेद करणाऱ्यांना या घटनेनं सणसणीत प्रतिउत्तर मिळाले आहे असं म्हणायला हरकत नाही. वाचा : काळीज धस्स करणारा Video कॉल, वडिलांच्या डोळ्यादेखत पोलिसानं स्वत:वर झाडली गोळी भिवंडीत लेकींनीच वृद्ध पित्याला दिला खांदा काही दिवसांपूर्वी भिवंडी तही अशाच प्रकारे मुलींनी आपल्या वृद्ध वडिलांच्या निधानानंतर खांदा दिला होता. ऐन वृद्धापकाळात गरीबीमुळे नातेवाईकांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली. यामुळे मुलींनी समाजाला चपराक लगावत, आपल्या वडिलांना मुखाग्नी दिला आहे. हे दृश्य पाहून उपस्थित असणाऱ्या अनेकांचे डोळे पाणवले होते. गणपत कृष्णा भोईर असं निधन झालेल्या 87 वर्षीय वडिलांचं नाव आहे. ते भिवंडी शहरातील नारपोली भागात आपल्या पत्नी विठाबाई गणपत भोईर यांच्यासोबत वास्तव्याला होते. या भोईर दाम्पत्यास एक मुलगा तर तीन मुली असा परिवार होता. मात्र काही वर्षांपूर्वी डोक्यात ताप शिरल्याने भोईर दाम्पत्याचा 25 वर्षीय मुलगा गणेश वेडसर होऊन मृत पावला. ऐन तारुण्यात मुलगा गेल्याने भोईर दाम्पत्यावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. गरीबीमुळे त्यांच्या सर्व नातेवाईकांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली. अशा स्थितीत तिन्ही मुलींनी आळीपाळीने आपल्या आई वडिलांचा सांभाळ करायला सुरुवात केली. अशात गणपत भोईर यांचं वृद्धापकाळाने निधन झालं. वडिलांचं निधन झाल्यानंतर त्यांना अग्नी देण्यासाठी नातेवाईकांमधील कोणीही पुढे सरसावलं नाही. त्यामुळे तिन्ही मुलींनींच आपल्या वडिलांवर अंत्यसंस्कार करण्याचं ठरवलं