JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / पंकजा ताईंवर अन्याय, कार्यकर्त्याची जीवाची बाजी, आता मुंडे निस्सीम समर्थकाच्या भेटीला जाणार

पंकजा ताईंवर अन्याय, कार्यकर्त्याची जीवाची बाजी, आता मुंडे निस्सीम समर्थकाच्या भेटीला जाणार

पंकजा मुंडे यांना विधान परिषदेच्या निवडणुकीत डावलल्यामुळे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या मुकुल गर्जे या कार्यकर्त्याची आता स्वत: पंकजा भेट घेणार आहेत.

जाहिरात

मुंडे यांचे कट्टर समर्थक मुकुंद गर्जे यांनी रोगर हे किटकनाशक औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अहमदनगर, 18 जून : भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना पक्षाकडून विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी (MLC election) उमेदवारी मिळाली नाही म्हणून भाजपमधील (BJP) अंतर्गत धुसफूस समोर आली होती. पंकजा यांना विधान परिषदेच्या निवडणुकीत डावलल्यामुळे त्यांचे समर्थक प्रचंड आक्रमक झाले होते. त्यांच्या समर्थकांनी काही ठिकाणी भाजप कार्यालयाबाहेर आंदोलने केली. तर काहींनी थेट विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांचा ताफा दोनवेळा अडविण्याचा प्रयत्न केला. पंकजा यांच्या अहमदनगरमधील (Ahmednagar) एका समर्थकाने तर थेट विष पिवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. या कार्यकर्त्याचं मुकूल गर्जे असं नाव आहे. या कार्यकर्त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गर्जे यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. त्यानंतर आता पंकजा मुंडे स्वत: मुकूल गर्जे यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी अहमदनगरला जाणार आहेत. भाजपकडून पंकजा मुंडे यांना विधान परिषदेसाठी उमेदवारी मिळाली नाही म्हणून मोठा गदारोळ झाला होता. काही ठिकाणी भाजप कार्यकर्ते आणि मुंडे समर्थक आमनेसामने आले होते. या सर्व घडामोडींदरम्यान पंकजा मुंडे यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नव्हती. त्यानंतर आता एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पंकजा त्यांचे समर्थक मुकुल गर्जे यांच्या भेटीसाठी अहमदनगरच्या पाथर्डी शहरात जाणार आहेत. त्या विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजेच 21 जूनला पाथर्डी शहरात जाणार आहेत. पंकजा यांना विधान परिषदेच्या निवडणुकीची उमेदावारी मिळाली नाही यावर त्या मौन आहेत. पण त्यानंतर त्या पहिल्यांदाच पाथर्डीला येत असल्याने याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे. या दरम्यान पंकजा मोहटादेवी येथे देखील दर्शनासाठी जाणार आहेत. ( बोरीवलीत भाजप-शिवसेना कार्यकर्ते आमनेसामने, आदित्य ठाकरेही घटनास्थळी ) पंकजा मुंडे यांना विधान परिषदेला उमेदवारी नाकारल्यानंतर मुंडे समर्थक संतापले. अहमदनगरमधील पाथर्डी तालुक्यातील पंकजा मुंडे यांचे समर्थक मुकुंद गर्जे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. पंकजा मुंडे यांना सातत्याने भारतीय जनता पार्टीकडून डावसले जात आहे, अशी भावना मुंडे समर्थकांची आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत मुंडे यांना उमेदवारी न दिल्याने पाथर्डी येथील मुंडे यांचे कट्टर समर्थक मुकुंद गर्जे यांनी रोगर हे किटकनाशक औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. गर्जे यांना उपचारासाठी पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र पुढचा धोका पाहता त्यांना अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. पंकजा मुंडे यांना सातत्याने राजकारणात स्वतःच्याच पक्षाकडून डावलले जात असल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले होते. पंकजा यांचं मौन सुटणार? विधान परिषदेच्या दहा जागांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला तेव्हा भाजपकडून पंकजा यांना उमेदवारी दिली जाईल का? अशा चर्चांना उधाण आलं होतं. या दरम्यान पंकजा यांनी आपल्यावर जी जबाबादारी पक्षाकडून दिली जाईल ती आपण समर्थपणे पार पाडू, असं विधान केलं. पण पंकजा यांना अपेक्षेप्रमाणे यावेळी देखील उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे त्यांचे समर्थक आक्रमक झाले होते. या दरम्यान पंकजा यांनी मौन घेतलं होतं. त्यांनी या विषयावर अद्यापही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे येत्या 21 जूनला पंकजा अहमदनगरच्या दौऱ्या दरम्यान त्यांचं मौन सौडणार का? असा प्रश्न उपस्थित होतोय.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या