JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / जमिनीच्या वादातून आधी तलवारीने वार, नंतर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा केला प्रयत्न, नगरमधील घटना

जमिनीच्या वादातून आधी तलवारीने वार, नंतर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा केला प्रयत्न, नगरमधील घटना

अहमदनगर-औरंगाबाद रोडवरील अमीर मळा येथे जागेच्या वादावरून झालेल्या वादात एकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अहमदनगर, 31 ऑगस्ट : जमिनीच्या वादातून अहमगदनगरमध्ये (ahmednagar) धक्कादायक घटना समोर आली आहे. नगर शहराच्या उपनगरामध्ये जमिनीच्या वादातून एकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणात बशीर पठाण हे गंभीर भाजले असून त्यांच्यावर अहमदनगर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणात भिंगार पोलीस ठाण्यामध्ये तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अहमदनगर-औरंगाबाद रोडवरील अमीर मळा येथे जागेच्या वादावरून झालेल्या वादात एकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला.  बशीर पठाण असं या व्यक्तीचे नाव आहे. जखमी झालेल्या बशीर पठाण यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. (आई वडिलांनी सांगितलं अभ्यास कर, तर 12 वीच्या विद्यार्थिनीनं उचललं टोकाचं पाऊल) नातेवाईकांमध्ये जमिनीच्या वादातून ही घटना घडली आहे. जमिनीच्या वादावरून पठाण आणि नातेवाईकांमध्ये वाद झाला. यातून नातेवाईकांनीच पठाण यांच्यावर तलवारीने हल्ला केला. बशीर पठाण यांच्या मांडीवर तलवारीने वार करण्यात आला.  त्यानंतर अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेमध्ये बशीर पठाण हे 80 टक्के भाजले आहेत. (माझं तुझ्यावर प्रेम, लग्न करायचंय.. तरुणीने नकार दिला तर त्याने थेट..) बशीर पठाण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या जमिनीचा वाद सुरू असून या वादातून ही घटना घडल्याची माहिती आहे. याबाबत भिंगार पोलीस स्टेशनमध्ये तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आह. जागेच्या वादावरून थेट जिवंत जाळण्याचा प्रकार घडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या