JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / "लाव ते रे तो व्हिडिओ" म्हणत सुषमा अंधारेंनी घेतला विरोधकांचा समाचार

"लाव ते रे तो व्हिडिओ" म्हणत सुषमा अंधारेंनी घेतला विरोधकांचा समाचार

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे शिवसेना नेत्या वैशाली सूर्यवंशी यांच्या नेतृत्त्वात आयोजित करण्यात आलेल्या महाप्रबोधन सभेत त्या बोलत होत्या.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

जळगाव, 3 नोव्हेंबर : 2019 च्या निवडणकीपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी लाव रे तो व्हि़डिओ म्हणत आपल्या प्रचारसभांमध्ये व्हिडिओच्या माध्यमातून विरोधकांवर जोरदार टीका केली होती. यानंतर आता उद्धव ठाकरे गटाच्या महाप्रबोधन सभेत उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आता लाव रे तो व्हिडिओ म्हणत उद्धव ठाकरेंनी केलेल्या कार्याचा व्हिडिओ दाखवला आहे. सुषमा अंधारे यांनी या सभेत व्हिडिओच्या माध्यमातून विरोधकांवर जोरदार टीका केली. तसेच उद्धव ठाकरेंनी आपल्या मुख्यमंत्राच्या कार्यकाळात केलेले कामही दाखवून विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे शिवसेना नेत्या वैशाली सूर्यवंशी यांच्या नेतृत्त्वात आयोजित करण्यात आलेल्या महाप्रबोधन सभेत त्या बोलत होत्या.

गुलाबराव पाटलांच्या कारकिर्दीत मोठा घोटाळा -

संबंधित बातम्या

आमदार चिमणराव पाटील यांच्या मतदारसंघातील एरंडोल येथे ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची महाप्रबोधन सभा झाली. जळगावात बोलताना त्यांनी भाजप आणि गुलाबराव पाटील यांच्यावर निशाणा साधला. कोरोना काळात गुलाबराव पाटील यांच्या कारकीर्दीत व्हेंटिलेटरचा घोटाळा झाल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे. मात्र, भाजपच्या लोकांचा किंवा भाजपचे निकटवर्तीय असलेल्या लोकांचा घोटाळा निघाला तर किरीट सोमय्या काहीही बोलत नाहीत. तर, इतरांबद्दल तोच विषय ओढून ताणून आणला जातो, असा आरोपही त्यांनी केला. हेही वाचा -  ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाच्या आदेशाची पायमल्ली? जळगावातील सभेत ‘धनुष्यबाणाचा’ वापर सुषमा अंधारे पुढे म्हणाल्या, की बीकेसी मेळाव्यासाठी तुम्ही दहा कोटी खर्च केले. एखादा पक्ष रजिस्टर नसतानासुद्धा ते पैसे कुठून खर्च केले? कोणाच्या खात्यातून खर्च केले? असे अनेक प्रश्न सुषमा अंधारे यांनी उपस्थित केले. भावना गवळी, प्रताप सरनाईक, यशवंत जाधव यांना ईडीच्या नोटिसा दिल्या आणि चौकशा सुरू झाल्या. मात्र त्या चौकशा अचानक कशा थांबल्या? असा सवालही सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या